Netflix : 5 रुपयांत महिनाभर पाहता येणार वेब सीरिज आणि टीव्ही शो

Netflix : 5 रुपयांत महिनाभर पाहता येणार वेब सीरिज आणि टीव्ही शो

युजर्सना साइन अप करण्याआधी ही ऑफर दिसत असेल तर त्यांना आधी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडावा लागेल.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : अमेरिकन ऑनलाइन स्ट्रीमिंग आता नव्या ग्राहकांसाठी पहिल्या महिन्यात 5 रुपयांमध्ये मिळणार आहे. नेटफ्लिक्सचा हा टेस्ट प्लॅन असून तो काही युजर्सनाच दिसू शकतो. एका महिन्याची मुदत संपल्यानंतर ग्राहकांना रेग्युलर प्लॅन सिलेक्ट करता येणार आहे. पहिल्यांदा जे युजर्स नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनसाठी लॉग इन करतील त्यातील काहींनाच याचा फायदा मिळेल.

युजर्सना साइन अप करण्याआधी ही ऑफर दिसत असेल तर त्यांना आधी सबस्क्रिप्शन प्लॅन निवडावा लागेल. नेटफ्लिक्सचे सध्या चार प्लॅन उपलब्ध आहेत. जर तुम्हाला मोबाइलवर त्याचा वापर करायचा असेल तर 199 रुपये द्यावे लागतील. बेसिक प्लॅनसाठी 499, स्टँडर्स प्लॅन 699 तर प्रीमियम प्लॅन 799 रुपयांचा आहे. एक महिन्याच्या मुदतीचे हे प्लॅन आहेत.

नेटफ्लिक्सने मार्केटिंग आणि नेटफ्लिक्सला प्रमोट करण्यासाठी हे पाउल उचललं आहे. सध्या या ऑफरची चाचणी सुरू आहे. जर यात चांगला प्रतिसाद मिळाला तर ही ऑफर सर्व नव्या ग्राहकांसाठी लागू केली जाईल.

नेटफ्लिक्स एक अशी व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे ज्यावर ग्राहक ओरिजनल सीरिजसह अनेक प्रसिद्ध टीव्ही शो, चित्रपट, वेब सीरीज पाहू शकतात. सध्या नेटफ्लिक्स सर्वात महागडी ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस देते. तर अॅमेझॉन प्राइम 129 रुपयांत महिनाभर पाहता येते. यासोबत अॅमेझॉन प्राइम म्यूझिकचा फायदाही मिळतो. तसंच अॅमेझॉनवर व्हिडिओ रिझोल्युशनला कोणतंही बंधन नाही. नेटफ्लिक्ससोबत हॉटस्टारचा प्लॅनही महिन्याला 199 रुपयांत मिळतो.

वाचा : Jio, Airtel, Vodafone-Idea : कंपन्याकडून 547 GB पर्यंत डेटाची ऑफर

First published: February 22, 2020, 5:27 PM IST
Tags: netflix

ताज्या बातम्या