सावधान Netflix Scam : एक चूक पडू शकते महागात! सबस्क्राइब करताना अकाउंट होईल खाली

सावधान Netflix Scam : एक चूक पडू शकते महागात! सबस्क्राइब करताना अकाउंट होईल खाली

Netflix चं तुमचं सबस्क्रिप्शन थांबवलं आहे, तुमच्या सबस्क्रिप्शनच्या बिलिंगला प्रॉब्लेम आला आहे अशा अर्थाचा मेल तुम्हाला आला असेल तर अजिबात उघडू नका आधी हे वाचा.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : Netflix चं तुमचं सबस्क्रिप्शन थांबवलं आहे, तुमच्या सबस्क्रिप्शनच्या बिलिंगला प्रॉब्लेम आला आहे अशा अर्थाचा मेल तुम्हाला आला असेल तर अजिबात उघडू नका आधी हे वाचा.

कदाचित हा email बनावट असू शकतो. नेटफ्लिक्सच्या नावाने काही ऑनलाईन चोर क्रेडिट कार्डचा तपशील चोरून यूजर्सचं बँक खातं रिकामं करत आहेत. अगदी खऱ्याखुऱ्या नेटफ्लिक्ससारखा बनावट लोगो वापरून ही फसवाफसवी सुरू आहे.

अजूनही बाहेरचं जग Coronavirus च्या विळख्यात आहे आणि रुळावर यायचं नाव घेत नाही. अशा वेळी घरात बसून कामासाठी मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमच हाताशी आहे. याचाच फायदा घेत काही ठग खोट्या जाळ्यात फसवायचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही Netflix या OTT प्लॅटफॉर्मचे यूजर  असाल किंवा नव्यान सबस्क्राइब करणार असाल तर सावधान. नेटफ्लिक्सच्या लोगोचा आणि नावाचा वापर करत काही जण बनावट पोर्टलला तुमच्या क्रेडिट कार्डचे तपशील साठवून ठेवत आहेत.

अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झालेली आहे.  या फोटोत दिसणारी स्क्रीन पाहा. खऱ्या नेटफ्लिक्सच्या धाटणीची रचना करून बनावट अकाउंटला तुमचे क्रेडिट कार्ड डिटेल्स जोडले जातात आणि तुमच्या लक्षातही येणार नाही, अशा पद्धतीने तुमचे पैसे एका क्लिकवर चोरीला जातात.

नेटफ्लिक्सकडून आलाय असं वाटणारा एक मेल येतो. तुमच्या अकाउंटला प्रॉब्लेम आहे, किंवा सबस्क्रिप्शन कायम ठेवण्यासाठी माहिती अपडेट करा या अर्थाचा मेल येतो. खाली लिंक असते. नुकसान टाळण्यासाठी त्यावर तातडीने क्लिक करण्याचा सल्ला या Email मध्ये असतो. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलंत की, नेटफ्लिक्ससारख्या दिसणाऱ्या पोर्टलवर तुम्ही जाता. तिथे नेटफ्लिक्सच्याच आयडीने लॉगइन करायला सांगतात. तुम्ही लॉगइन करून क्रेडिट कार्ड डिटेल्स भरलेत की, पुन्हा तुम्हाला नेटफ्लिक्सच्या खऱ्या साईटवर वळवलं जातं. त्यामुळे यूजरला हे fake किंवा बनावट असल्याचा किंचितही अंदाज येत नाही. क्रेडिट कार्ड डिटेल्स दिले हे तो विसरूनही जातो.

खात्यातून पैसे गायब होतात, तेव्हाच ही फसवणूक लक्षात येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही external link ला क्लिक करणं टाळायलाच हवं. Netflix ने या घोटाळ्यापासून सावध राहायचा सल्ला दिला आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 30, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading