मुंबई, 29 ऑक्टोबर: नेटफ्लिक्स (Netflix)वर आपला आवडता सिनेमा बघताना किंवा वेब सीरिज बघताना कधी कधी डेटा संपतो. आणि आपल्याला पुन्हा डेटा अॅक्टिव्ह होण्याची वाट बघत बसावं लागतं. अशा अँड्रॉईड युझर्ससाठी नेटफ्लिक्सने नवं फिचर आणणार आहे. स्क्रीन टर्नऑफ हे नवं फिचर लवकरच नेटफ्लिक्स येणार आहे. या फिचरमुळे अँड्रॉईड युझर्स कमी डेटामध्ये जास्त कॉन्टेंट पाहू शकतात. स्क्रीन टर्न ऑफ या फिचरमुळे तुमचा डेटा वाचलेलच आणि तुम्हाला एकाचवेळी इतर कामं करता येतील.
नेटफ्लिक्सवरच्या स्क्रीन टर्नऑफ या फिचरद्वारे तुम्ही एखादी फिल्म किंवा वेब सीरिज ऐकू शकता. एखाद्या ऑडिओ बुकप्रमाणे तुम्ही इतर कामं करता करता फिल्म किंवा वेबसीरिज ऐकू शकता. असा पर्याय नेटफिक्स तुमच्यासाठी आणणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला डेटाही कमी लागेल. स्क्रीन टर्न ऑफ या फिचरवर सध्या डेव्हरपर्स काम करत आहेत. लवकरच नेटफिल्क्स हा पर्याय तुमच्यासाठी आणणार आहे.
फ्री सब्सक्रिप्शन
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मची फ्री मेंबरशीप तुम्हाला हवी असेल तर तुमच्यासाठी एका चांगली बातमी आहे. नेटफ्लिक्स मोफत वापरायचं असल्यास विकेंडला तुम्हाला फ्री सब्सस्क्रिप्शन देण्याची ऑफर नेटफ्लिक्सने आणली आहे. कंपनीने अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर जाहीर केली आहे. आपल्याकडे नेटफ्लिक्स नसल्यास नेटफ्लिक्सवर आपण दोन दिवस विनामूल्य बेव सीरिज, शो किंवा चित्रपट पाहू शकता.