नवी दिल्ली, 8 मे : नेपाळ आपल्या सुंदरतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने अनेक प्रवासी नेपाळला फिरण्यासाठी जातात. भारतातून सर्वाधिक संख्येने लोक नेपाळ दरवर्षी जातात. जर तुम्हीही कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही जुलैमध्ये नेपाळ ट्रिप प्लॅन करू शकता. यासाठी भारतीय रेल्वे च्या IRCTC ने एक स्पेशल टूर पॅकेज ऑफर आणली आहे. IRCTC Gems of Nepal Ex Lucknow अशी ही टूर असून तुम्ही कमी पैशांत फिरण्याची संधी मिळवू शकता.
IRCTC ने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या टूरबाबत माहिती दिली आहे. हे संपूर्ण पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्री असं आहे. त्यासह या पॅकेजमध्ये अनेक सुविधाही मोफत देण्यात येणार आहेत.
काय असणार सुविधा -
- या पॅकेजमध्ये फ्लाइटने Economy क्लास लखनऊ ते काठमांडू जाण्या-येण्याची संधी आहे.
- ट्रॅव्हल इन्शोरन्सची सुविधा
- प्रत्येक ठिकाणी रात्री हॉटेलमध्ये थांबण्याची सुविधा
- प्रत्येक ठिकाणी बस किंवा कॅबने जाण्याची सुविधा
- प्रवासदरम्यान टूर गाइडही असेल
- दर दिवसासाठी एक लीटर पाण्याची बॉटल मिळेल
- ब्रेकफास्ट आणि डिनरची सुविधा मिळेल.
किती असेल किंमत -
- एकट्याने प्रवास करायाचा असल्यास 48,500 रुपये द्यावे लागतील.
- दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती 39000 रुपये शुल्क असेल.
- तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती 38,850 रुपये.
- लहान मुलांसाठी वेगळे पैसे भरावे लागतील.
हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचं आहे. 19 जुलै रोजी टूर सुरू होईल आणि 24 जुलै रोजी संपेल. सर्वात आधी प्रवास लखनऊ एयरपोर्टवरुन सुरू होईल. फ्लाइट लखनऊवरुन काठमांडू पोहोचेल. काठमांडू इथे पोहोचल्यावर हॉटेल स्टे असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्धनाथ स्तूप, पशुपतिनाथ मंदिर, पोखरा मनोकामना मंदिर, दरबार स्क्वायर, गुप्तेश्वर महादेव गुन्हा, विन्ध्यवासिनी मंदिर इथे दर्शन घेता येईल. त्यानंतर काठमांडू टू पोखरा जाता येईल. तिथे काही सुंदर ठिकाणी फिरता येईल. त्यानंतर फ्लाइटने पुन्हा लखनऊला येऊन 6 दिवसांची टूर संपेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.