मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवी कार घेताय? या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

नवी कार घेताय? या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित Cars, क्रॅश टेस्टमध्ये मिळालं 5 स्टार रेटिंग

ज्यावेळी कार कंपन्या नव्या कार्स लाँच करतात, त्यावेळी ग्लोबल एनसीएपी गाड्यांचं टेस्टिंग करतं आणि त्या क्रॅश टेस्ट करुन सेफ्टी सर्टिफिकेशन दिलं जातं. ग्लोबल एनसीएसीने भारतातील सर्वात सुरक्षित कार्सची लिस्ट जारी केली आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 17 एप्रिल : कार खरेदी करताना त्याच्या सेफ्टी फीचर्सला आधी प्राथमिकता दिली जाते. त्यामुळेच गाड्यांचं क्रॅश रेटिंग महत्त्वपूर्ण ठरतं. ग्लोबल एनसीएपी एजेन्सी गाड्यांचं टेस्टिंग करुन 5 स्टारपैकी रेटिंग देतं. गाडीला जितके स्टार अधिक तितकी कारची सुरक्षा अधिक असते. या टेस्टमध्ये अडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीवर विशेष लक्ष दिलं जातं. ज्यावेळी कार कंपन्या नव्या कार्स लाँच करतात, त्यावेळी ग्लोबल एनसीएपी गाड्यांचं टेस्टिंग करतं आणि त्या क्रॅश टेस्ट करुन सेफ्टी सर्टिफिकेशन दिलं जातं. ग्लोबल एनसीएसीने भारतातील सर्वात सुरक्षित कार्सची लिस्ट जारी केली आहे. Mahindra XUV700 SUV - या कारला अडल्ट सेफ्टीसाठी 5 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालं आहे. तसंच चाइल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार क्रॅश टेस्टिंग मिळालं आहे. सेफ्टीच्या हिशोबाने कारला सात एयरबॅग दिले गेले आहेत. Mahindra XUV300 - Mahindra च्या या SUV ला अडल्ट सेफ्टीसाठी 5 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार मिळाले आहेत. Mahindra XUV300 अडल्ट सेफ्टीसाठी 17 पैकी 16.42 आणि चाइल्ड सुरक्षेसाठी 49 पैकी 37.44 नंबर्स दिले आहेत. Tata Punch - सब-कॉम्पॅक्ट SUV ला अडल्टसाठी सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 4 स्टार क्रॅश टेस्ट रेटिंग मिळालं आहे. Tata Altroz या हॅचबॅक कारला सेफ्टीसाठी 5 स्टार रेटिंग आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 3 स्टार मिळाले आहेत. Tata Nexon ला अडल्ट सेफ्टीसाठी 5 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 3 स्टार मिळाले आहेत. अडल्ट सेफ्टीसाठी 17 पैकी 16.13 आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 49 पैकी 29 नंबर्स मिळाले आहेत. Honda City कारला दोन फ्रंट एयरबॅगसह चौथ्या जनरेशनला टेस्ट केलं गेलं. होंडा सिटी सध्या इतर सेफ्टी फीचर्ससह सहा एयरबॅगसह येते. या कारला अडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. Mahindra Thar भारतीयांमध्ये अतिशय पॉप्युलर कार असून या कारला अडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 4 स्टार रेटिंग मिळालं आहे. थार दोन एयरबॅगसह येते. Tata Tigor/Tiago कारला अडल्ट सेफ्टीसाठी 4 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीसाठी तीन स्टार मिळाले आहेत. 2 फ्रंटल एयरबॅगसह याची टेस्ट करण्यात आली होती. Toyota Urban Cruiser ला अडल्ट सेफ्टीसाठी 4 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीसाठी तीन स्टार मिळाले आहेत.
First published:

Tags: Car

पुढील बातम्या