मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

NASA 17 जानेवारीला करणार जगातल्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटची चाचणी

NASA 17 जानेवारीला करणार जगातल्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटची चाचणी

अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन संस्था 17 जानेवारीला करणार आहे. जगातली आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) 17 जानेवारी रोजी 'नासा'कडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे.

अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन संस्था 17 जानेवारीला करणार आहे. जगातली आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) 17 जानेवारी रोजी 'नासा'कडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे.

अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन संस्था 17 जानेवारीला करणार आहे. जगातली आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) 17 जानेवारी रोजी 'नासा'कडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 14 जानेवारी : गेल्या वर्षभरात अवकाश संशोधनात खूप मोठं काम झालं आहे. वर्षभरापूर्वी अंतराळ प्रवास सहलींची कल्पनाच शक्य होती. मंगळ, चंद्र आदी ग्रहांवर माणूस जाऊन पोहोचू शकतो, याच्याही कल्पना करणं संशोधनामुळे शक्य झालं होतं. मात्र आता अंतराळ पर्यटन या विषयाच्या अनुषंगाने इतक्या वेगाने काम होत आहे, की नजीकच्या भविष्यकाळात या साऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत. याच दिशेने पुढे जाणारा एक प्रयोग अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन संस्था 17 जानेवारीला करणार आहे. जगातली आतापर्यंतची सर्वांत शक्तिशाली रॉकेट स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) 17 जानेवारी रोजी 'नासा'कडून (NASA) प्रक्षेपित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या चाचणीचा हा शेवटचा टप्पा आहे. 'नासा'ने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली रॉकेटचा उपयोग गैरव्यावसायिक मानवी अवकाश मोहिमांसाठी केला जाणार आहे. या नव्या यंत्रणेवर गेली काही वर्षं काम सुरू आहे. त्याची चाचणी काही ना काही कारणांमुळे लांबणीवर पडत गेली होती. सध्या 'नासा' आर्टिमिस मोहिमेवर काम करत आहे. ही मोहीम तीन टप्प्यांची असून, तिसऱ्या टप्प्यात एका महिला आणि एका पुरुष अंतराळवीराला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येणार आहे. 17 जानेवारीला होणारं प्रक्षेपण हा आर्टिमिस मोहिमेचाच भाग आहे.

(वाचा - बापरे! नियम मोडल्याबद्दल मोटारसायकल चालकाला तब्बल एक लाखाहून अधिक दंड)

स्पेस लाँच सिस्टीम (Space Launch System) हा नासाच्या आर्टिमिस (Artemis) मोहिमेचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच नासा सर्वांत शक्तिशाली रॉकेटची (Powerfull Rocket) निर्मिती करत आहे. रॉकेटचे दोन महत्त्वाचे भाग असतात. एक म्हणजे द्रवरूप इंधनाचं इंजिन (Liquid Fuel Engine) आणि दुसरा म्हणजे घनरूप इंधन बूस्टर (Solid Fuel Booster). एका रॉकेटमध्ये अनेक बूस्टर्सचा उपयोग केला जातो. अंतराळ यानाला पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडण्यासाठी ही बूस्टर्स अतिरिक्त बळ देत असतात. सुरुवातीला यंत्रणा सुरू होण्यासाठीच्या ज्वलनाची (Ignition test) चाचणी घेतल्यानंतर नासा केवळ द्रवरूप इंधनाच्या इंजिनची चाचणी घेईल. ही चाचणी म्हणजे एकूण आठ टप्प्यांतल्या चाचणीचा शेवटचा टप्पा असेल. या प्रक्रियेला नासाने एसएलएस ग्रीन रन (SLS Green Run) असं नाव दिलं आहे. चाचणीचा याच्या आधीचा टप्पा 20 डिसेंबर रोजी पार पडला होता. त्या चाचणीत रॉकेटने 2.65 लाख लिटर अतिशीत द्रवरूप इंधन घेऊन जाण्याची क्षमता सिद्ध केली होती.

(वाचा - 20 महिन्यांची चिमुकली जग सोडून जाण्याआधी वाचवून गेली 5 लोकांचा जीव)

17 जानेवारीची चाचणी नासाच्या मिसिसिपीतल्या क्षेत्रात सेंट लुईस खाडीच्या जवळच्या स्टेनिस स्पेस सेंटरवर केली जाणार आहे. अलाबामातील हंटस्विले येथील नासाच्या मार्शन्ल स्पेस फ्लाईट सेंटरच्या एसएलएस स्टेजेस मॅनेजर जूली बासलेर यांनी सांगितलं की, ग्रीन रन टेस्टच्या वेट ड्रेस रिहर्सलवेळी कोअर स्टेज, स्टेज कंट्रोलर आणि ग्रीन रन सॉफ्टवेअर अशा सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं कार्य केलं. इंधन टाकी पूर्ण भरलेली होती. दोन तासांपर्यंत टाकीतून कोणत्याही प्रकारची गळती झाली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. आतापर्यंतच्या चाचण्यांतल्या अनुभवातून आम्हाला असा विश्वास वाटतो, की प्रत्यक्ष चाचणी घेण्यात कोणतीही अडचण नाही, असंही जूली यांनी सांगितलं. आताचं रॉकेट 322 फूट लांबीचं असून, सॅटर्न व्हीपेक्षा (363 फूट) थोड्या कमी उंचीची आहे. सॅटर्न व्ही या रॉकेटने 1960 मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाण्याची कामगिरी केली होती. सॅटर्न व्हीच्या (Saturn V) तुलनेत एसएलएसची लिफ्टऑफची (Lift-off Power) शक्ती 15 टक्क्यांनी जास्त आहे. तसंच, या नव्या यंत्रणेत अंतराळात अधिक भार वाहून नेण्याचीही क्षमता आहे.

(वाचा - फ्रीमध्ये मिळणार स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे Flipkart ची खास ऑफर)

नासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एसएलएस ही नवी रॉकेट यंत्रणा चंद्रापर्यंत 27 टन एवढं वजन वाहून नेऊ शकते. आतापर्यंतच्या रॉकेट्सच्या तुलनेत या रॉकेटमध्ये कार्गो मूव्हर म्हणून काम करण्याचीही उत्तम क्षमता आहे. गेल्या काही कालावधीत शक्तिशाली रॉकेट्सच्या चाचण्या जगभर ठिकठिकाणी चालू आहेत. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या (SpaceX) फाल्कन नाईनच्या (Falcon 9) चाचण्या सुरू आहेत. तसंच, चंद्रावरील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने चांग-ई फाइव्ह हे यान सोडलं होतं, त्यासाठीही जगातलं सर्वांत शक्तिशाली रॉकेट वापरलं होतं, असा दावा चीनने केला आहे.
First published:

पुढील बातम्या