अंतराळातून दर 16 दिवसांनी मिळतोय गूढ सिग्नल, रेडिओ लहरींच्या 'जादू'ने संशोधकही चक्रावले

अंतराळातून येणारा एक रेडिओ सिग्नल वैज्ञानिकांना चक्रावून टाकत आहे. पहिल्यांदाच अशा रेडिओ सिग्नलचा शोध लागला आहे जो ठराविक काळाने पुन्हा पुन्हा येत आहे.

अंतराळातून येणारा एक रेडिओ सिग्नल वैज्ञानिकांना चक्रावून टाकत आहे. पहिल्यांदाच अशा रेडिओ सिग्नलचा शोध लागला आहे जो ठराविक काळाने पुन्हा पुन्हा येत आहे.

  • Share this:
    लंडन, 13 फेब्रुवारी : अंतराळाबद्दल प्रत्येकालाच कुतुहल असतं आणि त्यात परग्रहावर जीवसृष्टी असल्याचं तसेच उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा अधून मधून केला जातो. आता अंतराळातून येणारा एक रेडिओ सिग्नल वैज्ञानिकांना चक्रावून टाकत आहे. पहिल्यांदाच अशा रेडिओ सिग्नलचा शोध लागला आहे जो ठराविक काळाने पुन्हा पुन्हा येत आहे. वैज्ञानिकांनी या सिग्नलला एफआरबी असं नाव दिलं आहे. ब्रिटिश कोलंबियात फास्ट रेडिओ बर्स्टवर प्रयोग केला जात आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, एफआरबी एक अद्भुत रेडिओ सिग्नल आहे. कारण तो ठराविक काळाने पुन्हा येतो. असं याआधी कधी झालं नव्हतं. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार दर 16.35 दिवसांनी हा रेडिओ सिग्नल मिळतो. यामध्ये दोन अनोख्या गोष्टी आहेत. ठराविक काळाने तसाच येणारा हा पहिलाच रेडिओ सिग्नल आहे. तर आतापर्यंत जितक्या रेडिओ सिग्नलचा शोध लागला त्याच्या तुलनेत हा पृथ्वीपासून खूप दूर अंतरावरून येत आहे. अंतराळाच्या बाह्य भागातून हे सिग्नल येत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. एफआरबी पहिल्यांदा 2007 मध्ये शोधण्यात आला होता. आतापर्यंत वैज्ञानिकांनी दोन प्रकारच्या एफआरबीचा शोध लावला आहे. यात एकदाच रेडिओ सिग्नल सोडणाऱ्या आणि वारंवार रेडिओ सिग्नल सोडणाऱ्या एफआरबीचा समावेश आहे. संशोधकांनी वारंवार मिळणाऱ्या रेडिओ सिग्नलचं नाव FRB 180916 असं ठेवलं आहे. एफआरबी रेडिओ सिग्नल 50 कोटी प्रकाश वर्ष अंतरावरून येत असल्याचं म्हटलं आहे. सप्टेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 च्या दरम्यान संशोधकांनी रेडिओ टेलिस्कोपवरून FRB 180916 चे निरीक्षण केलं. त्यात हे सिग्नल सलग चार दिवस जाणवतात आणि पुन्हा 12 दिवस मिळत नाहीत. अशा पद्धतीने पुन्हा 16 दिवसांत हेच चक्र असते. वाचा : 'सांगायला ऑकवर्ड वाटतंय पण...', विकिपीडियाने सर्व भारतीय युजर्सना पाठवला मेसेज रेडिओ सिग्नल नेमके कुठून येतात हे समजलेलं नाही. हे सिग्नल एखाद्या ताऱ्यावरून किंवा ब्लॅक होलमधून येत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिथून हे सिग्नल येतात तो अक्षावर 16 दिवसात एक फेरी पूर्ण करत असावा. यासाठी दर 16 दिवसांनी असे सिग्नल येत असावेत. तसेच काही वैज्ञानिकांनी परग्रहवासियांबाबत शंका व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून हे सिग्नल पाठवले जात असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. वाचा : सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड
    First published: