• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 'मायजिओ अॅप' तब्बल 10 कोटीवेळा डाऊनलोड झालं !

'मायजिओ अॅप' तब्बल 10 कोटीवेळा डाऊनलोड झालं !

रिलायन्सचं 'मायजिओ अॅप' गुगल प्ले स्टोअर्सवरती तब्बल 10 कोटीपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड झालंय. अवघ्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने डाऊनलोड होणारं मायजिओ हे भारतातलं पहिलं मोबाईल अॅप आहे. तर सर्वाधिक डाऊनलोडिंगचा विक्रम मात्र, अजूनही 'हॉटस्टार'च्या नावावर आहे.

  • Share this:
मुंबई, 11 ऑगस्ट : रिलायन्सचं 'मायजिओ अॅप' गुगल प्ले स्टोअर्सवरती तब्बल 10 कोटीपेक्षा जास्तवेळा डाऊनलोड झालंय. अवघ्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने डाऊनलोड होणारं मायजिओ हे भारतातलं पहिलं मोबाईल अॅप आहे. तर सर्वाधिक डाऊनलोडिंगचा विक्रम मात्र, अजूनही 'हॉटस्टार'च्या नावावर आहे. मोबाईलच्या एन्ड्राईल या सॉप्टवेअर्सवरती वर्षभरात सर्वाधिकवेळा डाऊनलोड होणारं मायजिओ हे आता दुसऱ्या क्रमांकाचं अॅप बनलंय. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला वृत्तसंस्थेला ही माहिती दिलीय. जिओ अपॅला मोबाईल ग्राहकांचा असाच भरघोस प्रतिसाद मिळत गेला तर लवकरच आम्ही या क्षेत्रातही नंबर वन बनू, असा दावाही संबंधीत अधिकाऱ्यांनी केलाय. 'मोबाईल अॅप' डाऊनलोडिंगमध्ये रिलायन्स जिओनं एअरटेल. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरला यापूर्वीच मागं टाकलंय. या तिन्ही प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्यांचं अॅप डाऊनलोडिंग 1 कोटींच्या आसपास आहे. तर जिओटीव्ही, जिओ अॅपने 5 कोटींचा आकडा कधीच पार केलाय. येत्या सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओ स्वतःचा '4जी' स्मार्टफोनही बाजारात लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे हा फोन पूर्णपणे फ्री म्हणजेच फूकट दिला जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांना फक्त 1500 रुपयांचं सुरक्षा डिपॉजिट भरावं लागणार आहे. ते देखील दीड वर्षांनंतर परत मिळणार असल्याने रिलायन्सचा 'चकटफू' मोबाईल बाजारात येताच जिओ आपल्या प्रतिस्पर्धी मोबाईल कंपन्यांना अगदी सहजपणे मागे टाकू शक्यता आहे.
First published: