मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

IMC 2020 : पुढच्या वर्षापर्यंत भारतात 5G सेवा सुरू, मुकेश अंबानी यांना विश्वास

IMC 2020 : पुढच्या वर्षापर्यंत भारतात 5G सेवा सुरू, मुकेश अंबानी यांना विश्वास

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL Chairman Mukesh Ambani) चे चेयरमन मुकेश अंबानी यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 साली दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL Chairman Mukesh Ambani) चे चेयरमन मुकेश अंबानी यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 साली दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL Chairman Mukesh Ambani) चे चेयरमन मुकेश अंबानी यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 साली दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई, 8 डिसेंबर : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL Chairman Mukesh Ambani) चे चेयरमन मुकेश अंबानी यांनी पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 साली दुसऱ्या सहामाहीमध्ये 5G सेवा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. इंडिया मोबाईल काँग्रेस-2020 (IMC 2020) ला संबोधित करताना, मुकेश अंबानी म्हणाले, 'खूप जलद असलेली 5G सेवा जलद गतीने सुरू करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. नीतिगत पावलं उचलली तरच आपण योग्य दरामध्ये सगळ्यांना 5G सेवा उपलब्ध करून देऊ शकतो.'

'आज जगभरात भारत सगळ्यात चांगल्या पद्धतीने डिजीटली जोडलेला देश आहे. भारतात 5G नेटवर्कला जलद गतीने लावायची गरज आहे. आपली कंपनी जिओ देशात 5G क्रांतीला सुरुवात करेल. 2021 सालच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये देशात जिओ 5G क्रांतीला सुरूवात करेल,' असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमयन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

'भारताला पुढे घेऊन जाण्यात कोणीही रोखू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडिया मिशनने आपत्ती आणि कोरोना महामारीच्या अडचणीवेळी जनतेला खूप साथ दिली. पुढेही आपला देश डिजीटल ट्रान्सफोर्मेशनच्या मार्गावर अशाचप्रकारे पुढे जाईल', अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली.

कोरोना संकटात 4G कनेक्टिव्हिटी डिजीटल लाईफलाईन

'देशभरात पसरलेल्या COVID-19 च्या प्रकोपामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. या काळात बहुतेक लोकं आपल्या घरातूनच काम करत होते. आमच्या हायस्पीड 4G कनेक्टिव्हिटी इनफ्रास्ट्रक्चर इंडियासाठी डिजीटल लाईफलाईन ठरली,' असं वक्तव्य मुकेश अंबानी यांनी केलं.

2020 साली सगळी कामं ऑनलाईन

मुकेश अंबानी आपल्या संबोधनात म्हणाले, '2020 साली महामारीमध्ये भारताने ऑनलाईन माध्यमावर जास्त लक्ष केंद्रीत केलं. यावर्षी भारतात लोकांनी ऑनलाईन काम केलं, ऑनलाईन अभ्यास केला, ऑनलाईन खरेदी केली, तसंच आरोग्य सेवाही ऑनलाईनच घेतल्या. लोकांनी ऑनलाईन गेमही खेळले. याशिवाय आपली दैनंदिन जीवनासाठीची कामंही ऑनलाईनच करण्यात आली.'

IMC 2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितल्या या महत्त्वाच्या गोष्टी

- भारतात मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सेवा सुरू केल्या

- भारत सरकारने इंडस्ट्रीला मदत केली

- डिजिटल सुधारणांमुळे देशातील कामकाज उत्तम

- गेल्या चार वर्षांत आयएमसीची भूमिका महत्त्वाची

- डिजिटल सुधारणा भारताची ताकद

- जिओ लवकरच भारतात 5G क्रांती आणणार

3 D’s

भारताची व्हायब्रंट डेमोक्रसी (India's Vibrant Democracy), भारताची यंग डेमोग्राफी (India's Young Demography), भारताचं डिजिटल ट्रान्सफोर्मेशन (India's Digital Transformation)

300 मिलियन लोकं वापरतात 2G सेवा

भारतामध्ये जवळपास 300 मिलियन मोबाईल ग्राहक अजूनही 2G सेवा वापरत आहेत, अशा लोकांसाठी काही नीतिगत पावलं उचलण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही डिजिटल सेवेचा लाभ मिळू शकेल.

कार्यक्रमात कोणाची उपस्थिती

या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद, दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे, तसंच दूरसंचार सचिव अंशू प्रकाश उद्घाटनला उपस्थित असतील, असं सीओआयने सांगितलं. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील भारती मित्तल आणि एरिक्सनचे प्रमुख नुनजियो मिरतिलोही या कार्यक्रमाला उपस्थित आङेत. याशिवाय इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 30 पेक्षा अधिक देश, 210 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पीकर, 150 पेक्षा जास्त कंपन्या, 3 हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

डिस्क्लेमर- न्यूज18 मराठी, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क18 मीडिया ऍण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग आहे. नेटवर्क18 इनव्हेस्टमेंट लिमिटेडचं स्वामित्व रिलायन्स इंडस्ट्रीजकडे आहे.

First published: