तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

तुमच्या ब्राउजिंग सिस्टिममधून कुकीज आणि स्टोरेज अॅक्सेस केलं जात. आता ते होऊ नये यासाठी मोझिलाने नवीन अपडेट केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : मोझिलाने बुधवारी फायरफॉक्स 70 लाँच केलं असून यामध्ये प्रायव्हसी प्रोटेक्शन वाढवलं आहे. मोझिलाने संपूर्ण फोकस गोपनीयतेत सुधारणा करण्यावर दिला आहे. यामध्ये ट्रॅक करणाऱ्यांना ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. गेल्या वर्षी फायरफॉक्स 63 लाँच केलं होतं. यामध्ये ट्रॅकिंग प्रोटेक्शन दिलं होतं. ज्यात थर्ड पार्टी ट्रॅकरकडून केलं जाणारं कुकीज आणि स्टोरेज अॅक्सेस ब्लॉक केलं होतं. तेव्हा पासून कंपनी सातत्याने सिक्युरिटी फीचरवर काम करत होती. आता नव्या अपडेटमध्ये सोशल ट्रॅकिंग सिस्टीम असेल.

मोझिलावर ट्रॅकिंग प्रोटेक्शन सिस्टिममध्ये सध्या फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन यासारख्या साइटवरून होणाऱ्या क्रॉस साइट ट्रॅकिंग कुकीजला ब्लॉक करतं. जर तुम्ही स्ट्रिक्ट मोड अॅक्टिव्ह केलात तर आणखी ट्रॅकर्सना ब्लॉक करते.

कंपनीने याबाबत सांगितले की, नव्या अपडेटमध्ये एक एनहान्स सिक्युरिटी फीचर आहे. प्रायव्हसी प्रोटेक्शन डॅशबोर्ड असं त्याचं नाव आहे. यामुळे कोण तुम्हाला ट्रॅक करत आहे हे समजतं. त्याचा वापर करून ट्रॅक करणाऱ्याला ब्लॉक करण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

ट्रॅकिंग प्रोटेक्शन रिपोर्टमधून कोणी किती वेळा कुकीजचा वापर कऱण्याचा प्रयत्न केला ये समजते. ऑनलाइन अॅक्टिव्हिटीच्या आधारे थर्ड पार्टी ट्रॅकर्स तुमची वेब प्रोफाइल तयार करतात. त्यांना आता ते सहजपणे करता येणार नाही. मोझिला दररोज तब्बल 10 अब्ज लोकांना ब्लॉक करत आहेत. नव्या फायरफॉक्स 70 मध्ये तुम्हाला हवा तसा रिपोर्ट तयार करू शकता. यामध्ये वेब ब्राउजिग अॅक्टिव्हिटी, ब्लॉक केलेल्या ट्रॅकर्सची लिस्ट याचा समावेश असेल. फायरफॉक्स 70 मध्ये एक नवं पासवर्ड मॅनेजरचं फीचरही देण्यात आलं आहे. लॉकवाइज असं हे फीचर आहे.

SPECIAL REPORT : दुष्काळाने होरपळणाऱ्या लातूरवर वरुणराजाची कृपा, दोनच दिवसात घडला चमत्कार!

Published by: Suraj Yadav
First published: October 23, 2019, 3:46 PM IST
Tags: technology

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading