दमदार बॅटरीसह बजेटमध्ये आला MOTO E7 प्लस, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

दमदार बॅटरीसह बजेटमध्ये आला MOTO E7 प्लस, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

या मोबाईलमध्ये ग्राहकांना एचडी+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी असे फीचर्स आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : फोन घेताना आपण बॅटरी, कॅमेरा आणि बेसिक फीचर्सचा विचार करतो. त्यातही अगदी आपल्या बजेटमधला फोन हवा असेल तर जरा बॅटरी आणि कॅमेऱ्यावर आपला फोकस असतो. बजेटमधला फोन MOTO E 7 प्लस फोन नुकताच कंपनीनं आणला आहे. या फोनची वैशिष्ट्य आणि फीचर्स काय आहेत जाणून घ्या.

या मोबाईलमध्ये ग्राहकांना एचडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी असे फीचर्स आहेत. हा स्मार्टफोन याच महिन्यात ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला. ब्राझीलमध्ये 18 हजार 700 रुपये किमतीमध्ये हा फोन उपलब्ध आहे. त्यामुळे भारतात 20 हजारांपर्यंत याची किंमत असेल अशी शक्यता आहे. MOTO E 7 प्लस मध्ये 4GB रॅम64 GB इंटर्नल मेमरी आहे.

वॉटरड्रॉप नॉच 6.5 इंच HD डिस्प्ले असेल. यासह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 610 जीपीयूची सुविधा उपलब्ध आहे. यासह मेमरी वाढवण्यासाठी मायक्रो कार्डची सुविधा आहे. ब्राँझ आणि नेव्ही ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये तो उपलब्ध असेल. हा फोन अँड्रॉइड 10 वर काम करतो.

हे वाचा-सावधान! तुमच्या WhatsApp वापरण्याच्या सवयीवर आहे Stalkerware सारख्या अ‍ॅपचं लक्ष

कॅमेरा आहे विशेष

कुठल्याही फोनचा कॅमेरा कसा यावर त्या फोनची लोकप्रियता ठरते. त्यानुसार मोटोच्या या फोनमधील कॅमेरा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.

प्रायमरी 48 मेगापिक्सल तर सेकंडरी 2 मेगापिक्सल सेन्सर आहे. फ्रंट कॅमरा ८ मेगापिक्सल हा खास सेल्फीप्रेमींसाठी आहे.

सर्वांत महत्वाचं म्हणजे बॅटरी बॅकअप होय. त्यामुळे या स्मार्टफोनमध्ये हे एक मोठे महत्त्वाचं वैशिष्ट्य जे सर्वांसाठी अत्यंत गरजेचं ठरतं देण्यात आलं आहे. 5000mAh ची दमदार बॅटरी जी 10W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल. ब्लूटूथ 5.0, 4 जी एलटीई, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक अशी असंख्य फीचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading