5G सोबत आता मिळणार दोन स्क्रीन! Motorola Razr भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

5G सोबत आता मिळणार दोन स्क्रीन! Motorola Razr भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

'या' कंपनीचा दोन स्क्रीनचा स्मार्टफोन भारतात दाखल : जाणून घ्या वैशिष्ट्यं

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : 5 जी (Motorola Razr 5G) हा स्मार्टफोन लाँच झाला. सोमवारी दुपारी 12 वाजता व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे मोटोरोला रेझर 5G हा फोन लाँच केला असून, खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसंच काही मोजक्या स्टोअरमध्येसुद्धा हा फोन उपलब्ध असेल . मोटोरोलाने Razr 5G हा मोबाईल फोन अमेरिकेमध्ये मागच्या महिन्यात लाँच केला होता तेव्हा तिथे ह्याची किंमत $1,399 म्हणजे 1,03 लाख रुपये होती. तज्ज्ञांच्या मते भारतामध्ये या फोनची किंमत एक लाखाच्या आसपासच असणार आहे.

फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगायचे तर या फोन मध्ये 2142x876 पिक्सल रिझोल्युशनसह 6.2 इंचांची प्लॅस्टिक OLED प्रायमरी स्क्रीन आहे. हा फोन फोल्डेबल डिस्प्ले 21:9 च्या अस्पेक्ट रेशोबरोबर येत आहे. कंपनीचा दावा आहे की फोनचा डिस्प्ले 2 लाख वेळा न थांबता फोल्ड आणि अनफोल्ड करता येऊ शकतो.

हे वाचा-फक्त 399 रुपयांत इतक्या ऑफर्स; Jio, Airtel, VI चे धमाकेदार प्लॅन

फोन मध्ये 600x800 पिक्सल रिझोल्युशनच्या बरोबर 2.7 इंचांचा एक OLED सेकंडरी डिस्प्ले दिला गेला आहे. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशो 4:3 आहे. तसंच या फोनच्या फ्रंट फ्लिप पॅनलवर डिस्प्ले लावला आहे. यामुळे यूजर फोन अनफोल्ड न करता नोटिफिकेशन्स चेक करू शकतात. हा फोन 256GB च्या इंटरनल मेमोरीमध्ये येणार आहे , यामध्ये स्नॅपडॅगन 765G SoC प्रोसेसर आहे. तसंच फोन हा फोन 8GB RAM बरोबर पण मिळू शकेल.

कॅमेरा आणि बॅटरीची वैशिष्ट्यं

या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे हा कॅमेरा फोनच्या फ्लिप पॅनेलवर आहे. त्यामुळे याचा वापर सेल्फीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. तसंच Moto Razer 5G मध्ये 2800mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली. कनेक्टिविटीसाठी या फोन मध्ये साइड माउंटेड फिंगरफ्रिंट स्कैनर बरोबर यूएसबी टाइप C सारखी स्टँडर्ड फीचर्स दिली आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 1:54 PM IST
Tags: mobile

ताज्या बातम्या