नवी दिल्ली, 10 जानेवारी : मागील कित्येक दिवसांपासून बहुप्रतिक्षित मोटो G71 5G (Moto G71 5G) ची चर्चा होती. अखेर आज Moto G71 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा जबरदस्त फोन सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत लाँच केला गेला आहे. या फोनला स्नॅपड्रॅगन 695 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे, जो भारतात पहिल्यांदाच देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन सिंगल स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. फोनची खास बाब म्हणजे याचा प्रोसेसर, अँड्रॉईड 11 आणि 50 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
Moto G71 5G फोन 6GB+128G स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. या फोनचा पहिला सेल Flipkart वर 19 जानेवारी 2022 रोजी सुरू होणार आहे.
Moto G71 5G स्पेसिफिकेशन्स?
- स्नॅपड्रॅगन 695 SoC प्रोसेसर
- 6.4 इंची FHD+ डिस्प्ले
- 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशन
- 60Hz डिस्प्ले रिफ्रेश रेट
- 5000mAh बॅटरी
- 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- साइड माउंटेड फिंगप्रिंट सेंसर
- IP52 प्रोटेक्शन
- Android 11
कॅमेरा -
Moto G71 5G फोनला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Moto G71 5G ला रियर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा क्वाड पिक्सल टेक्नोलॉजीसह देण्यात आला आहे. त्याशिवाय 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड प्लस डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तसंच एक मायक्रोविजन कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनला 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news