Home /News /technology /

Moto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स

Moto G 5G मोबाईल लवकरच लाँच, जाणून घ्या काय आहेत फिचर्स

Moto Edge+: मोटोरोलाचा Moto Edge+ कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. या फोनची एमआरपी  89,999 रुपये आहे, जो  64,999 रुपयांत विक्रीसाठी आहे. एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्केहून अधिक एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल.

Moto Edge+: मोटोरोलाचा Moto Edge+ कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. या फोनची एमआरपी 89,999 रुपये आहे, जो 64,999 रुपयांत विक्रीसाठी आहे. एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्केहून अधिक एक्सचेंज ऑफर उपलब्ध असेल.

या फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे.

    नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : वन प्लस नंतर आता 5G सपोर्ट सिस्टीमसह मोटोरोला कंपनीने आपला मोबाईल लाँच लवकरच लाँच होत आहे. मोटोरोला आपला 5 जी स्मार्टफोन Moto G 5 G 30 नोव्हेंबरला बाजारात आणणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार आपण 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर हा फोन उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, मोटोरोला साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात Moto G9 पॉवर स्मार्टफोन लाँच करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मोटोरोलाने या महिन्याच्या सुरुवातीलाच हे दोन्ही स्मार्टफोन युरोपियन बाजारात आणले आहेत. कंपनीचा असा दावा आहे की Moto G 5G स्मार्टफोन हा सर्वात स्वस्त 5 G स्मार्टफोन असेल. Moto G 5G, Moto G9 Power या दोन्ही फोनची किंमत आणि फिचर्स काय आहेत जाणून घ्या Moto G 5G या मोबाईलची किंमत 299.99 युरो म्हणजेच रुपयात विचार करायचा झाला तर साधारण 26 हजार 300 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज ग्राहकांना मिळणार आहे. moto G9 पावर फोनची किंमत साधारण 18 हजाराच्या आसपास असू शकते. हे वाचा-Whatsapp वर आलेली ही लिंक चुकूनसुद्धा क्लिक करू नका; शासनाने दिला इशारा Moto G 5G मोबाईलमध्ये काय आहे खास? या फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 6.7 इंच फुल-एचडी+ डिस्प्ले स्नॅपड्रॅगन 750 G प्रोसेसर 4GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आणि 1 TB पर्यंत मेमरी कार्डच्या मदतीनं वाढवता येणार आहे. याशिवाय फोनमध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा f/2.2 अॅपर्रचरसह 8 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा मिळणार आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या