नवी दिल्ली, 07 जानेवारी : नव्या वर्षात नवा स्मार्टफोन (Smartphone) घ्यायचा आहे. ज्यात जास्तीत जास्त फिचर्स असतील आणि किमतही कमी असेल. तर तुमच्यासाठी हीच वेळ योग्य आहे. तुम्ही Motorola चा फोन खरेदी करू शकता. 20,999 रुपयांचा Moto G 5G तुम्हाला फक्त 7799 रुपयांत मिळतो आहे. आता अशी ऑफर नेमकी मिळते तरी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्हाला हा फोन ऑनलाइन खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
Moto G 5G च्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. यावर 4,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट दिला जातो आहे. यानंतर हा फोन 20,999 मध्ये मिळतो आहे. फोनवर 13,200 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे. प्रत्येक कंपनीच्या फोनवर एक्सचेंज वॅल्यू वेगळी असते. फोन एक्सचेंज करताना तुम्हाला तुमच्या फोनची माहिती द्यावी लागेल ज्यावर एक्सचेंज वॅल्यू ठरेल.
याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरील ईएमआयवर हा फोन घेतल्यास अतिरिक्त 1,000 रुपयांचा डिस्काऊंटही दिला जाईल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डमार्फत पेमेंट केल्यास 5% अनलिमिटेड कॅशबॅक दिला जाईल.
Moto G 5G चे फिचर्स
मोटो जी 5जी स्मार्टफोनला 6.7 इंच फुल-एचडी (1080×2520 पिक्सल) डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10, 2.2 गीगाहर्ट्जच्या क्लॉक स्पीडसहऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750जी प्रोसेसर आहे. 6 जीबी रॅम आणि 128 GB इंटरनल मेमरी. मायक्रोएसडी कार्डमार्फत 1 GB पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू देण्यात आला आहे. अॅस्पेट रेशिओ 20:9 आणि 90% अॅक्टिव्ह एरिया टच पॅनल देण्यात आला आहे.
हे वाचा - काय म्हणताय! 'चलते चलते' मिळणार वीज; रस्त्यावर फक्त चालण्याने ऊर्जा निर्मिती
बॅक पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल, दुसरा सेंसर 8 मेगापिक्सल आहे. यात अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आहे. याचा अपर्चर f/2.2 आहे. तिसरा सेंसर 2 मेगापिक्सलचा मॅक्रोसेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.
हे वाचा - कोरोना लशीसाठी माध्यम असलेलं Cowin नेमकं आहे तरी कसं; 10 वैशिष्ट्यं
फोनमध्ये 5G, 4G VoLTE, 4G LTE, WCDMA, GSM, ब्लूटूथ v5.1, NFC आणि USB कनेक्टिव्हिटी आहे. 802.11 a/b/g/n/ac हे वायफाय व्हर्जन देण्यात आलं आहे. 5,000 mAh बॅटरी आहे, जी 20 वॉट टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.