नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : Smartphone वेव फ्रिक्वेन्सीवर चालतात. त्यामुळे स्मार्टफोनमधून रेडिएशनचं उत्सर्जन होतं. हे उत्सर्जन वेगवेगळ्या स्मार्टफोनवर वॅट प्रति किलोग्रॅमच्या आधारे असतं. काही असे स्मार्टफोन आहेत, ज्यातून सर्वाधिक रेडिएशनचं उत्सर्जन होतं. हे रेडिएशन आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरतात.
जर्मनीची संस्था द फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन मेन्टेन्स दरवर्षी सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या स्मार्टफोनची लिस्ट जारी करते. या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर Motorola Edge चं नाव आहे. यातून 1.79 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होतं.
सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये दुसरा फोन Oneplus 6T आहे. या फोनमधून 1.55 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होतं.
तिसरा सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणारा स्मार्टफोन ZTE Axon 11 5G असल्याचं द फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन मेन्टेन्समध्ये सांगण्यात आलं आहे.
सर्वाधिक रेडिएशन सोडणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर Google Pixel 4a स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन 1.37 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित करतो.
पाचवा सर्वात जास्त रेडिएशन उत्सर्जित करणारा स्मार्टफोन Oppo Reno 5G असल्याचं द फेडरल ऑफिस फॉर रेडिएशन प्रोटेक्शन मेन्टेन्समध्ये सांगण्यात आलं आहे. Oppo च्या फोनमधून 1.36 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन उत्सर्जित होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.