नवी दिल्ली, 29 डिसेंबर : यंदा अॅपलने (Apple) चायनीज टेक कंपन्यांना मागे टाकत स्वतःच्या गेम्स लाँच केल्या. त्याचवेळी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मदतीने मेड इन इंडिया (Made In India) उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला. अॅपल इंडिया ऑनलाइन स्टोअर (Apple Online Store) हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.
अॅपल हे वर्षातून एकदा फोन, काही प्रकारचे आयपॅड (ipad) आणि मॅक (Mac) लाँच करते, असं गणित मानलं जातं. मात्र 2020 हे वर्ष आश्चर्यचकीत करणारे ठरले, असं म्हणावं लागेल. यंदा अॅपलने पाच नवे आयफोन (iPhone), तीन आयपॅड रिफ्रेश (ipad), मॅकबुक प्रो चे (Mac book pro) 13 आणि मॅकबुक एअरला (Macbook Air) 2 नवे अपडेट मिळाले. 27 इंचाचे सुंदर असे आयमॅक (imac), अॅपल वॉचेस (Apple Watches), होम पॉड मिनी (Home Pad Mini), अत्यंत महाग आणि आकर्षक एअर पॉडस (Air Pods) यांचा देखील यंदाच्या नव्या उत्पादनांमध्ये समावेश होता.
तसेच यंदा हार्डवेअरबाबतीतही अनेक घडामोडी अॅपलमध्ये पाहायला मिळाल्या. आयओएस 14 ही सर्वात मोठी अपडेट आणि मॅकमधील मॅक आयओएस बीग सूर यांचा या घडामोडींमध्ये समावेश होता. आयपॅड आणि मॅक्समध्ये अत्यंत पुसटशी रेषा दिसून आली तर आयपॅड एअर आणि आयफोन 12 हे कार्यक्षमता आणि अनुभवांमुळे प्रो या पर्यायाच्या अगदी जवळ होते. भारतासाठी रोमांचक गॅझेटच्या पलिकडे बरेच काही उपलब्ध होते.
या सर्व घडामोडींमुळे इतकी वर्षे भारतासाठी आभासी वाटणारे दरवाजे खुले झाले आणि अॅपल इंडिया ऑनलाइन स्टोअरमुळे (Online Stores) अन्य 37 देशांच्या यादीत समाविष्ट झाला. दिवाळी फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर असलेल्या खरेदी हंगामापूर्वी हे घडले होते. यामुळे भारत अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश असलेल्या यादी समाविष्ट झाला. भारतात प्रथमच सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी अॅपल सरसावला. ग्राहकांना उत्पादनाची निवड, घरपोच डिलीव्हरी, तसेच विक्रीपश्चात सेटअप आणि सपोर्ट आदी सेवा द्यायच्या असतील तर केवळ ऑनलाइन विक्रेते, वितरक, ई-कॉमर्स फ्लॅटफार्मवर अवलंबून राहून चालणार नाही, ही बाब अॅपलने जाणली.
त्यानुसार अनुभवाच्या मानांकनाआधारे जसा ब्रिटनमधील एखादा ग्राहक अॅपल ऑनलाइन स्टोअरमधून एखादे उत्पादन केल्यानंतर त्यास ज्या सुविधा मिळतात, अगदी त्याच सुविधा आता अॅपल इंडिया ऑनलाइन स्टोअऱमधून उत्पादन खऱेदी केल्यानंतर भारतीय ग्राहकांना दिल्या जाणार आहेत.
अॅपलचा भारतात केवळ ऑनलाइन स्टोअर सुरु करणे हाच उद्देश नसून सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचणे हे उद्दिष्ट आहे. याकरिता अॅपलने ग्राहकांसाठी शॉपिंग असिस्टंटचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यामाध्यमातून ग्राहक तज्ज्ञांशी इंग्रजी किंवा हिंदीतून संपर्क साधू शकतील. हे तज्ज्ञ ग्राहकांना उत्पादन खरेदीपूर्व मार्गदर्शन करतील तसेच उत्पादन खरेदीकरिता सहाय्य करतील. भारतातील सर्व भाषांमध्ये लवकरच ही सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच अॅपलने बक्षीस स्वरुपात एक पर्याय उपलब्ध करुन दिला असून त्याव्दारे ग्राहक अॅपल एअर पॉडस (Apple Air Pods), अॅपल आयपॅड (Apple iPads) आणि अॅपल पेन्सिलमध्ये (Apple Pencil) टेक्स्ट किंवा इमोजी (emoji) रेखाटू शकणार आहेत. यात इंग्रजीसह बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगू या भारतीय भाषांचा पर्याय देण्यात आला आहे.
यंदा अॅपलने मेक इन इंडियाला दिलेले प्राधान्य ही आणखी एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. अॅपल आयफोन एसई (फर्स्ट जनरेशन), आयफोन 6 सिरीज, आयफोन 7 आणि आयफोन एक्स आर यांची निर्मिती करीत असून, या वर्षाच्या सुरुवातीला त्यात आयफोन 11चा देखील समावेश करण्यात आला. 2021 च्या सुरुवातीला आयफोन 12 चे उत्पादन भारतातील बेंगळुरुमधील वेस्ट्रॉन फॅसिलिटीजमध्ये (Wistron Facilties) केले जाईल. आयफोन एक्सआर आणि आयफोन 11 चे भारतात उत्पादन भारतात सुरु होताच किंमतीवर जसा परिणाम झाला तसाच काहीसा परिणाम आयफोन 12 चे भारतात उत्पादन सुरु होताच पाहिला मिळणार आहे.
भारत हे उत्पादनाचे तसेच निर्यातीचे हब व्हावे, तसेच स्थानिक उत्पादन निर्मितीला चालना मिळावी, यासाठी यंदाच्या उन्हाळा तसेच सणांच्या कालावधीत केंद्र सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सुरु केली. स्थानिक उत्पादनांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जूनमध्ये सरकारने 41,000 कोटींची प्रोत्साहनपर पीआयएलची घोषणा केली. या योजनेत अॅपल तसेच अॅपलचे उत्पादन सहभागधारक असलेल्या फॉक्सकॉन आणि विन्सट्रॉन यांनी सहभाग घेतला.
अॅपलचे भारतातील आतपर्यंतचे हे सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले. क्रमांकाच्या बाबतही अॅपल यंदा सरस ठरला. कॅनलायस फर्मच्या संशोधनानुसार, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतात 8,00,000 अॅपल फोन्सची विक्री झाली आहे. काऊंटरपाईंटच्या संशोधनानुसार, याच कालावधीत अॅपलने आयफोन एसई (2020), आयफोन 11 सिरीजच्या विक्रीत मोठी आघाडी घेतली. हा आकडा आयफोन 12 मिनी, आयफोन 12, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्सच्या लाँचिंगपूर्वीचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple