आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे, कधी आणि कसं सुरू होणार जाणून घ्या

आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे, कधी आणि कसं सुरू होणार जाणून घ्या

सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 200 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच झाल्यामुळे यूपीआय पेमेंट मार्केटमध्ये फोन पे, पेटीएम, गुगल पे यांना मोठी टक्कर मिळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे (WhatsApp) युजर्स आता भारतात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आता कोणत्याही दुसऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजरला यूपीआय आयडीमध्ये (UPI ID) पैसे पाठवता येणार आहेत. यूपीआय पेमेंट सर्व्हिस लाँच करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) मंजुरी मिळाली आहे.

WhatsApp कडून गेल्या अनेक काळापासून यूपीआय सिस्टमचं परीक्षण सुरू होतं. परंतु प्रायव्हसी प्रकरण अडकलं होतं. एनपीसीआयने गुरूवारी व्हॉट्सअ‍ॅप पेला लाईव्ह करण्याची परवानगी फेज वाईज दिली आहे. सध्या केवळ 20 लाख युजर्सच या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकणार आहेत.

(वाचा - WhatsApp वर येतंय जबरदस्त फीचर; 7 दिवसांत पाठवलेला मेसेज आपोआप गायब होणार)

सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 200 मिलियनहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप पे लाँच झाल्यामुळे यूपीआय पेमेंट मार्केटमध्ये फोन पे, पेटीएम, गुगल पे यांना मोठी टक्कर मिळणार आहे.

(वाचा - Jio Recharge Plan: केवळ 1 रुपया अधिक देऊन मिळवा 28 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी)

काय आहे यूनिफायइड पेमेंट इंटरफेस - UPI

यूनिफायइड पेमेंट इंटरफेस किंवा यूपीआय एक रियल टाईम पेमेंट सिस्टम आहे. ज्याने मोबाईल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये पैसे त्वरित ट्रान्सफर करू शकतो. यूपीआयच्या माध्यमातून एका बँक अकाउंटला अनेक यूपीआय अ‍ॅप लिंक करू शकता. अनेक बँक अकाउंटला एका यूपीआय अ‍ॅपद्वारे ऑपरेट करता येतं.

(वाचा - दिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या)

NPCI gives approval for WhatsApp to ‘Go Live’ on UPI in a graded manner.

WhatsApp can expand its UPI user base in a graded manner starting with a maximum registered user base of twenty (20) million in UPI. pic.twitter.com/96Ykz0aYTt

— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) November 5, 2020

ऑक्टोबरमध्ये 200 कोटी UPI ट्रान्झेक्शन -

कोरोना काळात लोकांनी घरी बसल्या बसल्या नवा रेकॉर्ड केला आहे. ऑक्टोबर 2020 दरम्यान, देशभरात यूपीआय बेस्ड ट्रान्झेक्शनमध्ये देशाने एका महिन्यात 200 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 6, 2020, 9:04 AM IST
Tags: whatsapp

ताज्या बातम्या