मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मोदी सरकारने बदलले नवीन SIM घेण्याचे नियम, आता या ग्राहकांना नाही मिळणार सिम कार्ड

मोदी सरकारने बदलले नवीन SIM घेण्याचे नियम, आता या ग्राहकांना नाही मिळणार सिम कार्ड

तुम्ही जर नवीन सिम कार्ड घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दूरसंचार विभागाने (Department of Telecom new rules) ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी मोबाईलचे नवीन सिम घेण्याच्या नियमांमध्ये (New SIM Issuance Rules) बदल केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: तुम्ही जर नवीन सिम कार्ड घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दूरसंचार विभागाने (Department of Telecom new rules) ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी मोबाईलचे नवीन सिम घेण्याच्या नियमांमध्ये (New SIM Issuance Rules) बदल केले आहेत. आता नवीन मोबाईल सिम घेण्यासाठी प्रीपेड किंवा पोस्टपेडसाठी फिजिकल फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. आता ग्राहक डिजिटल फॉर्म भरून प्रीपेड किंवा पोस्टपेड नंबरसाठी सहजपणे सिम मिळवू शकतात. या नवीन नियमामुळे ग्राहकांचं हे काम अगदी सहज पूर्ण होणार आहे, शिवाय तुमचा वेळही वाचेल.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या निर्णयाला मान्यता दिली आहे. अलीकडेच दूरसंचार विभागाने केवायसीचे नियम बदलले आहेत. नवीन नियमांनुसार, जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा सिमची आवश्यकता असेल, तर कनेक्शनसाठी केवायसी पूर्णपणे डिजिटल असेल. म्हणजेच आता कोणतेही कागदपत्र सादर करावे लागणार नाही किंवा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला 1 रुपयाचे पेमेंट करावे लागेल.  हे काम वेबसाइट किंवा अॅपद्वारे करू शकतात.

हे वाचा-आता WhatsApp वरही मिळणार Cashback! वाचा काय आहे हे भन्नाट फीचर

या स्टेप्सनी पूर्ण करा केवायसी प्रक्रिया

>> सिम प्रोव्हायडरचे अॅप डाउनलोड करा आणि आपल्या फोनवर नोंदणी करा.

>> तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याचा नंबर द्या ज्यावर तुम्ही OTP पाहू शकता.

>> OTP च्या मदतीने लॉगिन करा.

>> आता सेल्फ केवायसीचा पर्याय निवडा आणि माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करा.

18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना नाही मिळणार सिमकार्ड

दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना टेलिकॉम ऑपरेटर सिम कार्ड जारी करू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसेल तर त्यालाही सिमकार्ड उपलब्ध होणार नाही. आता नवीन सिम घेण्यापूर्वी CAF भरावा लागेल. हा फॉर्म म्हणजे ग्राहक आणि कंपनीतील करार असतो, यामध्ये महत्त्वाच्या अटी नमूद करण्यात आल्या आहेत.

हे वाचा-Alert! Google ने Play Store वर बॅन केले 136 धोकादायक Apps; लगेच करा डिलीट

सिम कार्ड घेण्यासाठी काय आहेत नियम?

>> इंडियन काँट्रॅक्ट लॉ 1872 अंतर्गत कोणताही करार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये असावा.

>> भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त 12 सिम घेऊ शकते.

>> मोबाईल कॉलिंगसाठी 9 सिम वापरता येतात.

>> या 9 सिमचा वापर फक्त मशीन-टू-मशीन कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Modi government