'नवी Privacy Policy मागे घ्या', मोदी सरकारचा WhatsApp ला दणका

'नवी Privacy Policy  मागे घ्या', मोदी सरकारचा WhatsApp ला दणका

WhatsApp ची सेवा, गोपनीयता आणि अटींमध्ये कोणत्याही प्रकारचे एकतर्फी बदल योग्य नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी : मोदी सरकारनं व्हॉट्सअॅपला (WhatsApp) आपल्या प्रायव्हेसी पॉलिसीत (Privacy Policy) केलेले बदल मागे घेण्यास सांगितलं आहे. WhatsApp ची सेवा, गोपनीयता आणि अटींमध्ये कोणत्याही प्रकारचे एकतर्फी बदल योग्य नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे आणि याबाबत पुन्हा विचार करण्यासही सांगितलं आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथार्ट यांना पत्र लिहिलं आहे. व्हॉट्सअप प्रायव्हसीतील बदलांबाबत पुन्हा विचार करावा आणि हे बदल मागे घ्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

जागतिक स्तरावर भारतामध्ये व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर होतो आणि व्हॉट्सअॅपसाठी भारत हे सर्वात मोठं मार्केट आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हेसी पॉलिसीतील बदल भारतीय नागरिकांच्या स्वायत्तेबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतं. त्यामुळे या प्रस्तावित बदलाबाबत पुन्हा विचार करावा.  भारतीय नागरिकांचाही विचार करावा. व्हॉट्सअॅपची सेवा, गोपनीयता आणि अटींमध्ये कोणत्याही प्रकारचे एकतर्फी बदल योग्य आणि स्वीकार्य नाहीत, असं या पत्रात म्हटलं आहे.

हे वाचा - Alert!एक क्लिक आणि 21000 कोटींचं नुकसान, या Apps चा वापर करणं धोकादायक ठरू शकतं

WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे अनेक युजर्समध्ये नाजारीचं, संभ्रमाचं वातावरण आहे. व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी सर्व युजर्सना ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. WhatsApp  ने आपली नवी पॉलिसी स्वीकारण्यासाठी युझर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी दिला होता.  सध्या कंपनीने या प्रायव्हसी पॉलिसीला स्थगिती दिली आहे. मात्र आपली खासगी माहिती, चॅट शेअर होण्याच्या भीतीने अनेकांनी WhatsApp ला इतर पर्याय शोधले आहेत. युजर्स या पॉलिसीमुळे इतर सुरक्षित ऍप्सकडे वळले.

हे वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी

लोकांच्या नकारात्मक कमेंटनंतर व्हॉट्सअ‍ॅपकडून सतत स्पष्टीकरण देण्यात येत आहे.  WhatsApp ने याचं खंडन करतं, प्रायव्हेट चॅट शेअर होणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून ब्लॉगद्वारे, ट्विट करून आणि  पहिल्यांदाच व्हॉट्सअ‍ॅपने स्वत:चं स्टेटस ठेऊन लोकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करत स्पष्टीकरण दिलं.

Published by: Priya Lad
First published: January 19, 2021, 4:38 PM IST

ताज्या बातम्या