Home /News /technology /

मोबाईल डेटा लवकर संपतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा

मोबाईल डेटा लवकर संपतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा

डेटा पॅकमध्ये मिळालेला डेटा (Data) कुठे संपतो कळत नाही आणि मग काही महत्वाची कामं अडून राहतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला फक्त सेटिंग्जमध्ये थोडे बदल करायचे आहेत.

    मुंबई, 30 नोव्हेंबर: आजकाल इंटरनेटशिवाय कोणतही काम होत नाही. दिवसभरासाठी मिळालेला डेटा संपण्याची सगळ्यांना भीती असते. मोबाईलमधील प्रत्येक App मोबाईल डेटा खात असतं. त्यामुळे दिवसभरातील डेटा संपल्यानंतर आपली अनेक कामे अडून राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हा डेटा वाचवण्याच्या काही टिप्स सांगणार असून या टिप्सच्या मदतीने तुम्ही डेटा मोठया प्रमाणात वाचवू शकता. OTT App बॅकग्राउंडवरून क्लिअर करा आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये अमेझॉन प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स यांसारख्या ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्मची मागणीदेखील खूप वाढली आहे. अनेकदा ही Apps फोनमध्ये बॅकग्राऊंडला सुरूच राहतात आणि खूप जास्त प्रमाणात डेटा खातात. त्यामुळे ही App वापरून झाल्यानंतर बॅकग्राउंडवरून क्लिअर करणे गरजेचे आहे. त्यामुळे डेटा वाचेल. Offline Maps चा वापर करा गुगलची गुगल मॅप्स ही एक प्रसिद्ध सेवा आहे. या सेवेमध्ये सामान्यपणे जास्त डेटा जातो. त्यामुळे हा मॅप सेव्ह करून तुम्ही वापरू शकता. मॅप डाउनलोड झाल्यानंतर GPS च्या मदतीने तुम्ही ऑफलाईन याचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या डेटामध्ये मोठी बचत होऊ शकते. सोशल नेटवर्किंग साइटचा कमी वापर फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही करत असाल तर तुमचा डेटा लवकर संपण्याची शक्यता आहे. तुमच्या या अ‍ॅपमध्ये ऑटो प्ले व्हिडीओ हा पर्याय बंद करून तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता. या अ‍ॅपवर आपोआप व्हिडीओ प्ले झाल्याने डेटा लवकर संपतो. सिस्टम अपडेट बंद करा फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स हे आपोआप अपडेट होत असतात. त्यामुळे फोनचा डेटा खूप जास्त प्रमाणात खर्च होतो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन ऑटो अपडेट बंद करावे लागेल. यामुळे तुम्ही तुम्हाला हवे असेल तेव्हा ते अ‍ॅप अपडेट करू शकता. यामुळे दिवसभर तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Mobile app, Techonology

    पुढील बातम्या