Home /News /technology /

नव्या वर्षात मोबाइल युजर्सना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

नव्या वर्षात मोबाइल युजर्सना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) मोबाईल टेरिफ (Mobile Tariff) वाढवण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या (Pre-Paid & Post-Paid Plans) किंमती वाढतील.

  नवी दिल्ली, 23 डिसेंबर : मोबाईल युजर्सला नव्या वर्षात महाग होणाऱ्या प्लॅन्सचा मोठा झटका बसू शकतो. टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) मोबाईल टेरिफ (Mobile Tariff) वाढवण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या (Pre-Paid & Post-Paid Plans) किंमती वाढतील. डिसेंबर 2019 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफमध्ये वाढ केली होती. त्यानंतर मोबाईल नेटवर्कला अपडेट करून 2G किंवा 3G वरून 4G करण्यात आलं. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आतापर्यंत टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. तेच पाहता आता पुन्हा टेलिकॉम कंपन्या टेरिफ वाढवण्याची योजना आखत आहेत. इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजेन्सीनुसार (ICRA), चालू आर्थिक वर्षात मोबाईल प्लॅन्स महाग होऊ शकतात. कंपन्याची कमाई 11 टक्क्यांनी वाढेल - वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) लिमिटेडने नुकतेच आपल्या पोस्टपेड प्लॅन्सचे दर वाढवले आहेत. यामुळे 2021-22 मध्ये त्यांच्या कमाईत वाढ होईल. त्याशिवाय हाय ऑपरेटिंग लिवरेजमुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी सुधारेल. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे डेटा वापर वाढला आहे. 2020-21 मध्ये इंडस्ट्रीच्या रेवेन्ह्यूमध्ये वाढ होईल. इक्राने दिलेल्या माहितीनुसार, टेरिफमध्ये वाढ आणि सततच्या अपग्रेडेशनमुळे (Network Upgradation)  टेलिकॉम कंपन्यांची कमाई 11 टक्के वाढेल. 2021-22 मध्ये जवळपास 13 टक्क्यांची वाढ होईल.

  (वाचा - ...अन्यथा अडचणी वाढणार;31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम,परिवहन विभागाची माहिती)

  कंपनीच्या कमाईसह, कर्जातही वाढ होण्याची शक्यता - टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईमधील वाढीसह त्यांच्या कर्जातही वाढ होईल. इक्राने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीवर 4.9 लाख कोटी रुपयांचं कर्ज राहील. पुढच्या वर्षात यात काहीशी कमी होऊन 2022 मध्ये कर्ज 4.7 लाख कोटी असेल. 2020 मध्ये राईट इश्यु, क्यूआयपी आणि एडिशनल स्पॉन्सर फंड इंफ्यूजनद्वारा टेलिकॉम कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज फेडलं. त्यामुळे 31 मार्च 2020 मध्ये टेलिकॉम कंपन्यांचं कर्ज कमी होऊन 4.4 लाख कोटी रुपये राहिलं, जे 31 मार्च 2019 मध्ये 5 लाख कोटी रुपये होतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Recharge, Telecom companies, Vodafone idea tariff plan

  पुढील बातम्या