Home /News /technology /

पहिल्यांदाच कंपनीने दिलीय अशी ऑफर, रिचार्जवर फ्री कॉलिंग आणि डेटासह मिळणार इन्श्युरन्स

पहिल्यांदाच कंपनीने दिलीय अशी ऑफर, रिचार्जवर फ्री कॉलिंग आणि डेटासह मिळणार इन्श्युरन्स

टेलिकम्युनिकेशन ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिलीच आहे. पण त्याचबरोबर स्वस्तात असे प्री-पेड प्लॅन दिले आहेत ज्यामध्ये ग्राहकांना इन्शुरन्स आणि इंटरनेट डेटा मिळणार आहे.

    मुंबई, 29 फेब्रुवारी : सध्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये रिचार्जच्या दरांवरून स्पर्धा रंगली आहे. जिओ बाजारपेठेत आल्यानंतर इतर कंपन्यांना त्याचा फटका बसला. त्यानंतर इंटरनेट, कॉलिंगचे दर एकदम कमी झाले. मात्र अलिकडेच दर वाढवण्यात आले आहेत. त्यानंतर कंपन्यांनी पुन्हा ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आकर्षक ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. एअरटेलनं त्यांच्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिलीच आहे. पण त्याचबरोबर स्वस्तात असे प्री-पेड प्लॅन दिले आहेत ज्यामध्ये ग्राहकांना इन्शुरन्स आणि इंटरनेट डेटा मिळणार आहे. एअरटेलने 179, 279 आणि 349 रुपयांच्या प्लॅनची ऑफर दिली आहे. यातील पहिल्या दोन प्लॅनमध्ये चार लाख रुपयांचा इन्शुरन्स आहे. तर तिसऱ्या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओची मेंबरशिपही दिली जाणार आहे. सर्वात स्वस्त 179 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची मुदत वैधता 28 दिवस असून एकूण 2 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय इतर नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये 300 मेसेज आणि दोन लाख रुपयांचा लाइफ इन्श्युरन्स मिळेल. 279 रुपयांचा प्लॅनची मुदतही 28 दिवस आहे. दररोज दीड जीबी डेटा यामध्ये मिळेल. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि चार लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. वाचा : Airtelच्या ग्राहकांसाठी खुशखबर, या 3 नवीन प्लानमधून मिळणार जास्त फायदा यामध्ये सर्वात महागडा प्लॅन 349 रुपयांचा आहे. 28 दिवसांसाठी असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम व्हि़डिओची मेंबरशिप मिळणार आहे. तसेच दररोज 100 मेसेजही मिळतील. वाचा : Vodafone Idea ची सेवा महागणार, एक एप्रिलपासून नवे दर?
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Airtel

    पुढील बातम्या