Jio, Vodafone, airtel चे बेस्ट प्लॅन, 149 रुपयांमध्ये मिळणार 'या' सुविधा

Jio, Vodafone, airtel चे बेस्ट प्लॅन, 149 रुपयांमध्ये मिळणार 'या' सुविधा

कॉलिंग आणि इंटरनेट दोन्हीसाठी कोणता Plan आहे सगळ्यात मस्त.

  • Share this:

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन या तीन कंपन्यांमध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या तिन्ही कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान घेऊन येत आहेत. त्यामधला तिन्ही कंपन्यांनी 149 चा प्लान आपल्या ग्राहकांसाठी लाँच केला आहे. या तीन पैकी सर्वात बेस्ट प्लान कोणता आणि का हे शोधण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

Vodafone, jio, airtel तिन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी 149 रुपयांचा प्रीप्रेड प्लान आणला आहे. पण कोणती कंपनी 149 रुपयांमध्ये सर्वात जास्त सुविधा देते पाहा.

Reliance Jio 149 Rupees Plan-

या प्लानमध्ये तुम्हाला जिओ ते जिओ unlimited free calling मिळणार आहे. 24 दिवसांसाठी हा प्लान वैध असणार आहे. 1 GB प्रतिदिन डेटा पॅक यानुसार 24 GB डेटा तुम्हाला मिळणार आहे. जिओ ते इतर नेटवर्कसाठी 24 दिवसांसाठी 300 मिनिटं फ्री मिळणार आहेत. यासोबत दरदिवसाला 100 SMS फ्री मिळणार आहेत.

हेही वाचा-jioची नवीन वर्षात खास भेट, 98 ते 2020 रुपयांपर्यंत बेस्ट प्लान

Airtel 149 Rupees Plan

Airtel च्या ग्राहकांना प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. Airtel ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. 2 GB डेटा आणि 300 SMS प्रतिदिवशी फ्री मिळणार आहेत. Xstream आणि विंक म्यूजिकसारखे Applicationचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

Vodafone 149 Rupees Plan

Vodafoneच्या प्रीपेड ग्राहकांना प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. vodafone ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग फ्री असेल. 2 GB डेटा आणि 300 SMS प्रतिदिवशी फ्री मिळणार आहेत. Zee 5 Applicationचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे.

कोणत्या प्लानमध्ये सर्वाधिक फायदा

तुम्ही जर कॉलिंगची सेवा अधिक वापरत असाल तर तुम्ही Vodafone किंवा Airtel प्लान घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला दोन्ही कंपन्या सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. तेच जिओसाठी काही ठरावीक मिनिटं मिळणार आहेत. पण तुम्ही डेटा जास्त वापरणार असाल तर रिलायन्स जिओचा प्लान सर्वात बेस्ट आहे.

हेही वाचा-दीड जीबी इंटरनेट डेटाही पुरत नसेल तर करा 'हा' रिचार्ज!

First published: January 18, 2020, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading