Jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना दणका, जाणून घ्या रिचार्ज किती महागले

Jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना दणका, जाणून घ्या रिचार्ज किती महागले

टेलिकॉम कंपन्यांनी प्रीपेड प्लॅनचे दर वाढवले असून यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 02 डिसेंबर: टेलिकॉम कंपन्यांनी मंगळवार 3 डिसेंबरपासून टेरिफ चार्जमध्ये 50 टक्के वाढ करण्याचे जाहीर केलं आहे. यात व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांचा समावेश आहे. तर जिओनेसुद्धा प्रीपेड शुल्कात वाढ करण्याच निर्णय घेतला असून 6 डिसेंबरपासून 40 टक्के दर वाढवण्याची घोषणा केली आहे.

आता टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाने सर्वच रिचार्जचे दर 40 ते 50 टक्क्यांनी वाढणार आहेत. तसेच महिनाभऱ कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी आता महिन्याला लागणाऱ्या 28 रुपयांच्या रिचार्जमध्येही वाढ झाली आहे. आता यापुढे किमान 49 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.

एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं आहे. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओनेही 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. नव्या प्लॅनमधून ग्राहकांना 300 टक्के जास्त लाभ देऊ असा दावा जिओने केला आहे. ऑल इन वन प्लस या प्लॅनमध्ये अनलिमिटेल कॉलिंग आणि इंटरनेट दिलं जाईल असंही जिओने म्हटलं आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीने कॉलिंगमध्ये प्रतिमिनीट 6 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे कंपनीचा 1699 रुपयांचा अनलिमिटेल वार्षिक प्लॅन 2 हजार 399 रुपये इतका होणार आहे. तसेच दररोज 1.5 जीबी डेटासाठी असलेला 199 चा प्लॅन 249 रुपये होईल.

Published by: Suraj Yadav
First published: December 2, 2019, 8:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading