नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : सरकारकडून डिस्प्ले आयातवर 10 टक्के शुल्क आकारण्यात आल्यानंतर, मोबाईल फोनच्या Mobile Phone किंमती तीन टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स एसोसिएशनने ICEA याबाबत माहिती दिली आहे. डिस्प्ले असेंबली आणि टच पॅनलवर हे शुल्क 1 ऑक्टोबरपासून लावण्यात येण्याचा प्रस्ताव होता.
आयसीईएचे ICEA राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी सांगितलं की, या निर्णयानंतर मोबाईल फोनच्या किंमतीत दीड ते तीन टक्क्यांपर्यंत वाढ होईल. ICEA सदस्यांमध्ये ऍपल, हुआवे, शाओमी, वीवोसारख्या कंपन्या सामिल आहेत. यासाठीच्या घटकांच्या घरगुती अर्थात देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणं आणि त्यानंतर त्याच्या आयातीला परावृत्त करणं हा यामागचा उद्देश आहे.
कोरोनामुळे उद्योग अपेक्षेप्रमाणे वाढू शकला नाही. मात्र सुट्या भागांच्या देशांतर्गत उत्पादनासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचं पंकज महेंद्रू यांनी सांगितलं. तसंच आता आमचं लक्ष केवळ आयातीची भरपाई करण्याकडे नाही, तर जागतिक बाजारात मोठा वाटा मिळवण्याकडे असल्याचंही पंकज महेंद्रू म्हणाले.
हे वाचा - 66 दिवस चालते 'या' स्वस्त 4 कॅमेरावाल्या स्मार्टफोनची बॅटरी, कंपनीचा दावा
दरम्यान, वेदांता समूहाचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विनस्टार डिस्प्ले टेक्नोलॉजीच्या नावाने 2016 मध्ये देशातील पहिला एलसीडी उत्पादन कारखाना सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर 68000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. परंतु या प्रस्तावाला सरकारकडून मंजूरी मिळाली नसल्याने, ही योजना पुढे जाऊ शकली नाही.
हे वाचा - गुगल प्ले स्टोरला टक्कर देण्यासाठी Paytmचं मेड इन इंडिया Mini App Store मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.