तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? चेक करा आणि सुरक्षिततेसाठी सेटिंग बदला

तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? चेक करा आणि सुरक्षिततेसाठी सेटिंग बदला

तुमचा फोन हॅक झाला आहे किंवा त्यातला डेटा चोरी तर होत नाही ना? हे चेक करा आणि सेटिंग बदलून फोन सुरक्षित ठेवा.

  • Share this:

जितंक नवं तंत्रज्ञान आलं तेवढा वेगाने या नवतंत्रज्ञान आत्मसात केलं जात आहे. सध्या स्मार्टफोनमध्ये सगळं जगच सामावलं आहे. अनेक कामे चुटकीसरशी या एका डिव्हाइसमुळे होतात. पण यालाही हॅकिंगचा धोका असल्याने नवीन अडचण निर्माण झाली आहे. हॅकर्स मोबाइलवर लिंक, स्पॅम टेक्स्ट मेसेज पाठवून हॅकिंग करतात. यात सर्वसामान्य, ज्यांना या मेसेजेसची कल्पना नसते ते फसतात.

फक्त अॅप डाऊनलोड करून किंवा मेसेजेसवरूनच हॅकिंग होतं असं नाही. तर इतरही अनेक प्रकारे हॅकर्स टार्गेट करत असतात. यामध्ये इमेल, खोट्या लिंक, फोनमध्ये असलेली अॅप्स, पॉप अप अॅड यांचाही समावेश असतो. आपला फोन हॅक झाला याबाबत आपल्याला जरासुद्धा कळत नाही.

तुमच्या फोनची बॅटरी वेगाने उतरत असेल तर फोनमध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. कारण हेरगिरीसाठी अशा मालवेअरचा वापर केला जातो ज्यामुळे डिव्हाइस स्कॅन केले जाते आणि त्यातील डेटा दुसऱ्या व्यक्तीला पाठवला जातो. अशी अॅप्स बॅकग्राऊंडला सुरु असतात त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष मोबाइल वापरत नसला तरी बॅटरी डाऊन होते.

फक्त बॅटरी डाऊन होते म्हणून फोन हॅक झाला असेही म्हणता येणार नाही. बॅटरी खराब झाल्याने किंवा चार्जिंग नीट न झाल्यानेही असे होऊ शकते. त्यासाठी तुम्ही सेंटिंगमध्ये जाऊन बॅटरी चेक करू शकता. तुमची बॅटरी कशासाठी, कोणत्या अॅपसाठी वापरली आहे हे पाहता येते. इथे जर तुम्हाला काही संशयास्पद वाटलं तर मालवेअर चेक करावे लागेल.

सातत्याने फोनवरील काही अॅप बंद होत असतील किंवा फोन हँग होत असेल तर मालवेअर असण्याची शक्यता असते. काही अॅप बंद, अनइन्स्टॉल केल्यानंतरही तसंच होत असेल तर फोन त्वरीत दुरुस्त करून घेणे हिताचे ठरेल.

इथंही तुमच्या डिव्हाइसची क्षमता, अॅप्सची संख्या आणि त्यावर असलेला डेटा हे महत्वाचं ठरतं. डिव्हाइस कमी क्षमतेचं असेल आणि डेटा, अॅप्स जास्त असतील तर फोन हँग होण्याचं प्रमाण जास्त असते. सेटिंगमध्ये जाऊन अॅपमध्ये तुम्ही कोणते अॅप जास्त मेमरी घेते हे पाहू शकता. त्यानुसार नको असलेली अॅप काढून टाकता येतात. फोनची मेमरी जास्त असूनही तुम्हाला समस्या येत असेल तर मालवेअर स्कॅन करावे लागेल.

मालवेअर फोनमध्ये असेल तर तुमचा इंटरनेट डेटा जास्त वापरला जातो. तुमच्या नकळत फोनमधील डेटा ऑनलाइन ट्रान्सफर होत असतो. यातून तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, क्रेडिट कार्ड नंबर यासह सेव्ह असलेली महत्वाची माहितीही पाठवली जाते. यावेळी डेटा वापर केला जातो. त्यामुळे तुमचा डेटा कोणत्या अॅपसाठी वापरला गेला याची माहिती तुम्हाला डेटा सेटिंगमध्ये मिळते ती चेक करा. त्यावरून तुम्ही वापरलेले अॅप आणि डेटा योग्य आहे की नाही हे पाहून मालवेअरबाबत अंदाज लावता येतो.

अँड्रॉइड फोनमध्ये अनेक अॅप इन्स्टॉल केल्यानंतर पॉप अप अॅड दिसतात. जर इंटरनेट कनेक्शन सुरु असेल तर वारंवार या अॅड समोर येतात. अशा वेळी अॅड ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा. या अॅडच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही कॉल केले नसतानाही एखादा नंबर किंवा टेक्स्ट मेसेज लिस्टमध्ये दिसत असेल तर सावधान. कारण अशा प्रकारचे फेक कॉल करून तुमचा मोबाइल ट्रॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्स करत असतात. तुम्ही कॉल केल्यानंतर कॉल ड्रॉप सातत्याने होत असेल तर यातही मालवेअर अॅटॅकची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, फक्त तुमचाच कॉल ड्रॉप होतोय की इतर कोणाचे हेसुद्धा चेक करणं गरजेचं आहे. कदाचित नेटवर्क प्रॉब्लेमही असू शकतो.

स्मार्टफोनवर सर्वच सोशल मीडिया अॅप इन्स्टॉल असतात. त्यांचे पासवर्ड, इमेल, ओटीपी इत्यादी फोनवरच येतात. कोणताही मेल तुम्ही वाचला नसतानाही तो रीड झाला असेल तर पासवर्ड बदलून तो सुरक्षित करा. अनेक सोशल मीडिया अॅपला ओटीपीने किंवा मेल लिंकने सुरक्षित करता येते. तसे केल्यास तुमचे सर्व सोशल मीडिया अकाउंट आणि इतर अॅप्समधील माहिती सुरक्षित राहिल.

Published by: Manoj Khandekar
First published: December 14, 2019, 12:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading