Sim Card बद्दल ट्रायचे नवे नियम उद्यापासून होणार लागू

Sim Card बद्दल ट्रायचे नवे नियम उद्यापासून होणार लागू

कमी पैशांमध्ये ग्राहकांना मिळणारी मोफत कॉल आणि डेटाची सुविधा लवकरच बंद होणार आहे. दोन्हीसाठी वेगवेगळे शुल्क आकारण्याबाबत ट्रायचा विचार सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर: टेलिकॉम कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्स, स्वस्त कॉल आणि इंटरनेट सुविधा आणि फ्री कॉलिंगची सुविधा लवकरच बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. TRAI याबाबत सध्या विचार करत असून कॉल आणि डेटासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान, मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी (MNP) लवकरच नवे नियम लागू होणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी केवळ तीन दिवस लागणार आहेत. 16 डिसेंबरपासून नवे नियम लागू करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI)घेतला आहे.

ट्रायच्या या नव्या प्रक्रियेत युपीसीची अट घालण्यात आली आहे. यामुळे सर्व्हिस एरियामध्ये तीन दिवसात पोर्ट करावे लागेल तर दुसऱ्या सर्कलमध्ये पोर्ट करण्यासाठी 5 दिवसांची मुदत असेल. यामुळे मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा वेगाने होणार आहे.

वाचा-सावधान! तुमचा कॉल रेकॉर्ड होतोय? जाणून घ्या कसं चेक करायचं

दुसरीकडे मोबाइल रिचार्ज महागणार असल्याने आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जिओने त्यांच्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे. एअरटेल, व्होडाफोन-आयडिया यांनी 50 टक्के तर जिओने 40 टक्के दरवाढ केली आहे. मात्र, तरीही देशात इंटरनेट स्वस्त असल्याचं माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी ट्विटरवरून सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने मोबाईल इंटरनेटच्या किंमती कमी केल्या आहेत. भारतात मोबाइल इंटरनेट डेटाची किंमत जगात सर्वात कमी आहे. ट्रायच्या म्हणण्यानुसार भारतीयांना प्रत्येक जीबीसाठी 11.78 रुपये मोजावे लागतात.

एअरटेलनं प्रतिदिन 50 पैसे ते 2.85 रुपये इतकी दरवाढ केली आहे. यामध्ये आता त्यांनी डेटा आणि कॉलिंगच्या सुविधा देण्यात येतील असं म्हटलं आहे. तसेच मर्यादित कॉल संपल्यानंतर प्रत्येक मिनिटाला 6 पैसे अधिक मोजावे लागतील असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

सर्वात स्वस्त सेवा पुरवणाऱ्या जिओनेही 40 टक्के दरवाढीची घोषणा केली आहे. नव्या प्लॅनमधून ग्राहकांना 300 टक्के जास्त लाभ देऊ असा दावा जिओने केला आहे. ऑल इन वन प्लस या प्लॅनमध्ये अनलिमिटेल कॉलिंग आणि इंटरनेट दिलं जाईल असंही जिओने म्हटलं आहे.

वाचा-स्मार्टफोनमध्ये सर्वात धोकादायक Bug; चेक करा तुमचा मोबाइल सुरक्षित आहे का?

व्होडाफोन आयडिया कंपनीने कॉलिंगमध्ये प्रतिमिनीट 6 पैसे दरवाढ केली आहे. यामुळे कंपनीचा 1699 रुपयांचा अनलिमिटेल वार्षिक प्लॅन 2 हजार 399 रुपये इतका होणार आहे. तसेच दररोज 1.5 जीबी डेटासाठी असलेला 199 चा प्लॅन 249 रुपये होईल.

First published: December 15, 2019, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading