तुमचा मोबाईल नंबर बदलणार; TRAI ने सांगितला नवा नियम

तुमचा मोबाईल नंबर बदलणार; TRAI ने सांगितला नवा नियम

डोंगल वापरणाऱ्यांसाठी 13 तर मोबाईल धारकांसाठी 11 अंकी नंबर असेल असंही TRAIनं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : आपल्या सगळ्यांचे मोबाईल नंबर 10 अंकांचे असतात आता ते 11 अंकी असणार आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) यासंदर्भात शुक्रवारी एक प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार TRAIच्या मते 10 ऐवजी 11 अंकी मोबाईल नंबर वापरला तर जास्त फोननंबर उपलब्ध होऊ शकतील.

फिक्स लाईनसाठी फोन करताना मोबाईलनंबर आधी शुन्य लावण्यात यावा असंही सांगितलं आहे. देशांतर्गत मोबाईल फोनद्वारे संवाद साधण्यासाठी नंबर आधी शून्य लिहून नंबर डायल करणं आवश्यक आहे.

हे वाचा-ड्रोनद्वारे केली जाणार औषधांची घरपोच डिलिव्हरी, स्पाइसजेट सुरू करतंय ही खास सेवा

देशात सध्या 10 आकड्यांचे 210 कोटी कनेक्शन आहेत. जे 7, 8 आणि 9 नंबरने सुरु होतात. ट्रायने म्हटले आहे की फिक्स्ड नेटवर्कमधून मोबाइलवर कॉल करण्यासाठी शून्य वापरणं अनिवार्य झाल्यानंतर 2, 3, 4 आणि 6 स्तरावर फ्री सब-लेवल्स मोबाईल नंबर म्हणून वापरता येऊ शकतात.

याशिवाय ट्रायनं नवीन राष्ट्रीय नंबर योजना सुचवली आहे. ही योजना लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. डोंगल वापरणाऱ्यांसाठी 13 तर मोबाईल धारकांसाठी 11 अंकी नंबर असेल असंही TRAIनं म्हटलं आहे.

हे वाचा-शाळा जूनला नाहीतर या तारखेला होणार सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

First published: May 30, 2020, 9:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या