मुंबई 12 मार्च : निति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोबाइल डेटा आणि कॉलिंगची किमान किंमत निश्चित करण्यासाठी आणि ठरवण्यासाठी तयारी दर्शवली आहे. टेलिकम्युनिकेशन कंपन्या सध्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यांना दर वाढवण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं निति आयोगाने म्हटलं आहे. टेलिकॉम कंपन्या कॉलिंग आणि डेटाची किंमत निश्चित करू शकतात. पण या क्षेत्रात सुरु असलेल्या किंमत युद्धामुळे कंपन्यांनी रेग्युलेटरी एजन्सीला यात हस्तक्षेप करण्यास सांगितंल आहे.
देशात सध्या मोबाइल युजर्सना 4 जी डेटा 3.5 रुपये प्रति जीबी असा वापरता येतो. त्यामुळे टेलिकॉम कंपन्या या दरात वाढ करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य झाली तर मोबाइल इंटरनेटचे दर 5 ते 10 पटींनी वाढण्याची शक्यता आहे.
वोडाफोन-आयडियाने डेटाची किंमत 35 रुपये प्रति जीबी तर एअरटेलनं 30 रुपये प्रति जीबी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सर्वात कमी दराचा प्रस्ताव रिलायन्स जिओने दिला आहे. जिओने डेटाची किंमत 20 रुपये प्रति जीबी करावी अशी मागणी केली आहे.
हे वाचा : डेटासाठी बंपर ऑफर, 247 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल
सध्या वोडाफोन- आय़डिया, एअरटेल यांचा डेटा दर प्रति जीबी 4 रुपये इतका आहे. तर रिलायन्स जिओचा दर 3.90 रुपये प्रित जीबी इतका आहे. दरवाढीबाबत टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया कंपन्यांशी चर्चा करत आहे. कम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने किमान किंमत निश्चित करणं हे एक पाऊल मागे घेण्यासारखं आहे असं म्हटलं आहे. यामुळे डेटा महागल्यानं बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो असे संकेतही दिले आहेत.
हे वाचा : Jio, Vodafone, Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, डेटासह फ्री कॉलिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.