Coronavirus ची जगभरातली खरी आणि ताजी माहिती एका क्लिकवर; Covid-19 ट्रॅकर झाला लाँच

Coronavirus ची जगभरातली खरी आणि ताजी माहिती एका क्लिकवर; Covid-19 ट्रॅकर झाला लाँच

Microsoft ची COVID-19 Tracker ही वेबसाइट जगभरातल्या कोरोनाव्हारसच्या संसर्गाबद्दल खरी आणि ताजी माहिती देते आहे. कशी मिळवायचे रिअल टाइम अपडेट्स?

  • Share this:

सॅन फ्रान्सिस्को, 16 मार्च :  कोरोनाव्हायरस अर्थात COVID-19 च्या महासाथीने जगभरात थैमान घातलेलं असतानाच त्याबद्दल गैरसमज आणि खोटे आकडेही मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. हा व्हायरस आतापर्यंत नेमका जगभरात कुठे पसरला आहे आणि रुग्णांची ताजी आकडेवारी काय याची माहिती देण्यासाठी आता मायक्रोसॉफ्ट ही मोठी आयटी कंपनी पुढे सरसावली आहे. Microsoft Bing टीमने Coronavirus च्या जगभरातल्या प्रसारासंदर्भात real time माहिती देणारी वेबसाइट सुरू केली आहे. COVID-19 Tracker ही वेबसाइट जगभरातल्या कोरोनाव्हारसच्या संसर्गाबद्दल खरी आणि ताजी माहिती देते आहे.

जगभरात coronavirus कुठे पसरला आहे, त्याचे रुग्ण किती आहेत, कुठल्या देशात आहेत आणि त्यापैकी किती बरे होऊन घरी परतले आहेत आणि किती मृत्यू झाले आहेत, याची ताजी आकडेवारी ही वेबसाइट देते आहे.

वाचा - कोल्हापूरच्या रुग्णाचा खरंच कोरोनामुळे झाला मृत्यू, वाचा काय आहे सत्य?

COVID-19 Tracker वर जगभरातल्या कोरोनाव्हायरस संसर्गाची माहिती देण्यात आली आहे. bing.com/covid यावर क्लिक केल्यावर हा ट्रॅकर ओपन होईल. ही बातमी अपलोड होण्याच्या वेळी या ट्रॅकरवर कोरोनाग्रस्तांचा जागतिक आकडा 169,657 होता. त्यापैकी 85,379 लोक अद्याप या व्हायरसविरोधात लढत आहेत. 77,761 लोकांना संसर्ग झाला होता, पण आता ते बरे झाले आहेत आणि जगभरात कोविड -19 मुळे 6,517 मृत्यू झाल्याची नोंद Microsoft COVID-19 Tracker  ने केलेली आहे. भारतातल्या दोघांच्या मृत्यूचा यात समावेश आहे.

संबंधित - सावधान मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील रुग्णांची संख्या 38 वर

Google सुद्धा असा इंटरॅक्टिव्ह मॅप करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यांच्याअगोदर आता मायक्रोसॉफ्टचा इंटरॅक्टिव्ह मॅप आणि ट्रॅकर लाँच झआला आहे. "आमच्या टीममधल्या बहुतेकांनी गेल्या आठवड्याभरात मॅपिंग आणि रिसोर्सिंगचं काम करत हा ट्रॅकर लाँच केला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बहुतेक जण घरातून काम (Work from home) करत होते," असं मायक्रोसॉफ्ट बिंगचे व्यवस्थापक मायकेल चेस्टर यांनी सांगितलं.

दरम्यान महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.

देशात आता सर्वाधिक कोरोनाव्हायरसचे रुग्ण महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहे. त्यानंतर मुंबई आणि परिसरात रुग्णांची संख्या अधिक आहे.  नागपूरमध्ये 4 रुग्ण आहेत. अहमदनगर आणि औरंगाबादमध्येही एकेक रुग्ण सापडल्याने काळजी वाढली आहे.

अन्य बातम्या

शहीद वडिलांच्या अंत्यसंस्काराला चिमुकला गाऊ लागला 'गोल-गोल रानी..', अश्रू अनावर

एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट

जर्मनीत अडकला भारताचा दिग्गज खेळाडू, कोरोनामुळे 15 दिवस तुटला कुटुंबाशी संपर्क

First published: March 16, 2020, 2:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading