Home /News /technology /

Microsoft AI Model: मायक्रोसॉफ्टची कमाल; चक्रीवादळ, महापुराच्या धोक्याचा देणार पूर्वानुमान

Microsoft AI Model: मायक्रोसॉफ्टची कमाल; चक्रीवादळ, महापुराच्या धोक्याचा देणार पूर्वानुमान

सनी लाइव्ह्ज (Sunny Lives) असं त्या मॉडेलचं नाव आहे.

    नवी दिल्ली, 28 जुलै: गेल्या काही काळात उष्णतेची लाट, अतिवृष्टी, दुष्काळ, चक्रीवादळं, महापूर अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशांना करावा लागतो आहे. भारतही त्यातून सुटलेला नाही. गेल्या काही महिन्यांतच आपण अशी विविध नैसर्गिक संकटं अनुभवली आहेत. या पार्श्वभूमीवर, उष्णतेच्या लाटेचं पूर्वानुमान देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence वर आधारित एक मॉडेल तयार करण्यात आलं आहे. सनी लाइव्ह्ज (Sunny Lives) असं त्या मॉडेलचं नाव आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया (Microsoft India) आणि सस्टेनेबल एन्व्हायर्न्मेंट अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट सोसायटी (SEEDS) या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन हे मॉडेल विकसित केलं आहे. भारतातल्या संभाव्य उष्णतेच्या लाटांचं पूर्वानुमान वर्तवण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे. चक्रीवादळं आणि महापुरासारख्या अन्य नैसर्गिक संकटांचं पूर्वानुमान वर्तवण्यासाठी (Prediction) या मॉडेलचा याआधी वापर करण्यात आला आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने लाइव्ह मिंट आणि झी न्यूजने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 2021मध्ये नैसर्गिक आपत्तींचा अंदाज आधीच वर्तवून धोका असलेल्या सुमारे सव्वा लाख नागरिकांना साह्य करणं हे नव्या मॉडेलचं उद्दिष्ट आहे. 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ह्युमॅनिटॅरियन अॅक्शन' (Artificial Intelligence for humanitarian action) या जागतिक उपक्रमांतर्गत हे नवं मॉडेल विकसित करण्यात आलं आहे. त्याचा उपयोग भारतातल्या नैसर्गिक आपत्तीचा धोका असलेल्या नागरिकांना साह्य करण्यासाठी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातल्या उष्णता लाटप्रवण भागातल्या संभाव्य धोक्यांचं पूर्वानुमान देण्यासाठी मॉडेल विकसित केलं जाणार आहे. Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा हवामानबदलाची (Climate Change) तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, भारतासह जगभरातल्या कोअर हीटवेव्ह झोन्समध्ये हीटवेव्ह अर्थात उष्णतेच्या लाटेच्या धोक्यातही वाढ होत आहे. येत्या काही दशकांत त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर हे मॉडेल विकसित करण्यात आलं आहे. उपग्रहाने टिपलेल्या उच्च क्षमतेच्या दर्जेदार प्रतिमा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोडिंग आणि नागरी वस्तीच्या प्रदेशांचं मूल्यमापन आदी बाबींचा उपयोग करून हे मॉडेल संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा जास्तीत जास्त अचूक अंदाज वर्तवू शकतं. भूकंप, वादळं, वणवे आणि जैविक संकटांचं पूर्वानुमान वर्तवण्याच्या दृष्टीनेही या मॉडेलचा उपयोग करून घेता येऊ शकतो. मायक्रोसॉफ्टच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये या मॉडेलच्या साह्याने दिल्ली आणि नागपूरमधल्या 50 हजार नागरिकांना आगामी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आधीच देण्यात आला होता.
    First published:

    Tags: Microsoft

    पुढील बातम्या