कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवस सुट्टी दिल्याचा कंपनीला झाला 'हा' फायदा!

मायक्रोसॉफ्टने जपानमधील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातील तीन दिवस सुट्टी देऊन एक प्रयोग केला. यात त्यांच्या कंपनीला फायदाच झाल्याचं समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 09:04 AM IST

कर्मचाऱ्यांना आठवड्यात तीन दिवस सुट्टी दिल्याचा कंपनीला झाला 'हा' फायदा!

टोकियो, 04 नोव्हेंबर : मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमधील त्यांच्या कर्मचाऱ्यांना एका महिन्यासाठी आठवड्याला तीन दिवस सुट्टी दिली. एक महिन्यासाठी वर्क लाइफ चॉइस चॅलेंज समर 2019 अंतर्गत प्रयोग करण्यात आला. यामध्ये जपानमधील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील चारच दिवस काम करावं लागलं.

आठवड्यात तीन दिवस सुट्टी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे इतर सुट्ट्यांची तडजोड करावी लागली नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीने जपानमध्ये केलेल्या या प्रयोगाचा फायदा झाला. तीन दिवस सुट्टी दिल्यानंतरही कंपनीच्या उत्पादकता 39.9 टक्के वाढली.

एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यानं कंपनीने वीजेचा वापरही कमी केली. नेहमीच्या तुलनेत 23.1 टक्के कमी वीज वापरल्याने तो खर्चही वाचला.

मायक्रोसॉफ्ट कंपनीला झालेल्या या फायद्यामध्ये मीटिंगचा वेळ कमी झाल्याचाही परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. आठवड्यातील फक्त चार दिवस काम असल्याने कंपनीत मीटिंग लवकर आटोपल्या गेल्या. अनेक मीटिंग समोरा-समोर होण्याऐवजी व्हर्च्युअल झाल्या. निर्णय लवकर घेतल्याने काम वेगाने झाले आणि त्याचा फायदा झाला.

महिन्याच्या शेवटी जेव्हा मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मतही विचारले. तेव्हा 92.1 टक्के कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील चार दिवस काम ही कल्पना चांगली असल्याचं म्हटलं आहे. प्रयोगाचे य़श पाहता मायक्रोसॉफ्ट तीन दिवस सुट्टी पुढेही लागू करण्याचा विचार कंपनी करत आहे. चार दिवस काम ही योजना यावर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात किंवा इतर महिन्यांमध्ये लागू करता येईल.

Loading...

मायक्रोसॉफ्टने केलेल्या या प्रयोगावर तज्ज्ञांनी म्हटलं की, प्रत्येक कंपनीला यामुळे फायदा होईल असं नाही. ज्या कंपन्यांना आठवड्यातील 7 दिवस काम करावं लागतं त्यांना अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल. याचा भार कंपनीच्या बजेटवर पडू शकतो.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: microsoft
First Published: Nov 5, 2019 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...