Home /News /technology /

Android वापरणाऱ्यांनो सावधान! हा व्हायरस खाली करेल तुमचं बँक अकाऊंट, Microsoft चा इशारा

Android वापरणाऱ्यांनो सावधान! हा व्हायरस खाली करेल तुमचं बँक अकाऊंट, Microsoft चा इशारा

आता सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्याने साहजिकच स्मार्टफोनचा (Smartphone) वापर वाढला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून बॅंकिंगसह आर्थिक व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा हॅकर्स (Hackers) घेत असल्याचं दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जुलै : आता सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्याने साहजिकच स्मार्टफोनचा (Smartphone) वापर वाढला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून बॅंकिंगसह आर्थिक व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. नेमक्या याच गोष्टीचा फायदा हॅकर्स (Hackers) घेत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे ऑनलाइन व्यवहारांचं प्रमाण वाढलं असताना, दुसरीकडे सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Crime) माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे (Fraud) प्रकार वाढत आहेत. हॅकर्स प्रत्येक वेळी नव्या पद्धती शोधून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एका धोकादायक व्हायरसच्या अनुषंगाने अँड्रॉइड युजर्सना (Android Users) सतर्क केलं आहे. या नव्या व्हायरसच्या (Virus) माध्यमातून हॅकर्स अँड्रॉइड युजर्सचं बॅंक अकाउंट रिकामं करू शकतात, असं मायक्रोसॉफ्टनं म्हटलं आहे. अँड्रॉइड युजर्सना मायक्रोसॉफ्टने अलर्ट जारी केला आहे. एक मालवेअर (Malware) अँड्रॉइड युजर्सना लक्ष्य करत आहे. हे मालवेअर युजरच्या नकळत प्रीमियम सब्सक्रिप्शन (Premium Subscription) ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हेट करत असल्याचं मायक्रोसॉफ्टनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अँड्रॉइड युजर्सनं पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. अँड्रॉइड युजर्सनं गुगल प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाउनलोड करतेवेळी अ‍ॅपशी निगडित गोष्टींची शहानिशा करावी. जर तुम्ही मालेशियस अ‍ॅप डाउनलोड केलं असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यात रॅपिड बॅटरी ड्रेन, कनेक्टिव्हिटीशी निगडीत इश्यु, डिव्हाईस हीटअप यांचा समावेश आहे. तसंच कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅप्स किंवा वेबसाईटवरून अ‍ॅप डाउनलोड करण्याबाबत सल्ला देण्यात आलेला नाही. सध्या एका व्हायरसच्या अनुषंगाने मायक्रोसॉफ्टनं अँड्रॉइड युजर्सना अलर्ट केलं आहे. मायक्रोसॉफ्टचे संशोधक दिमित्रीओस वलसामारास आणि सॉंग शिंग जंग यांनी सांगितलं, ``हे मालवेअर बिलिंग फ्रॉडच्या सबकॅटेगरीमधलं आहे. हे मालेशियस युजर्सच्या नकळत प्रीमिअम सर्व्हिस सबस्क्राईब करतं.`` हा टोल फ्रॉड एसएमएस किंवा कॉलप्रमाणे काम करत नाही. हे वायरलेस अ‍ॅप्लिकेशन प्रोटोकॉलवर काम करतं. हा यूजरनं फोनच्या माध्यमातून खरेदीचं बिल दिल्यानंतरही परत बिल अदा करतं. हे मालवेअर वाय-फायवर (Wi-fi) काम करत नाही. काही मालवेअर अ‍ॅप्स (Malware Apps) तुम्हाला वाय-फाय डिस्क्नेक्ट करायला लावतात आणि मोबाईल डाटा वापरण्यासाठी दबाव आणतात, असं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून ही मालवेअर अ‍ॅप्स सब्सक्रिप्शन सुरू करतात. युजरला याविषयी वेबसाइटवर माहितीदेखील जाते. मात्र यासाठी ओटीपीची (OTP) गरज नसते कारण ही अ‍ॅप्स ओटीपी लपवतात. असे प्रकार टाळण्यासाठी यूजर्सनं काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जी अ‍ॅप्स तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त परमिशन्स मागत असतील त्यांच्याबाबत तुम्ही सतर्क होणं आवश्यक आहे. जर एखादं अ‍ॅप बनावट डेव्हलपर प्रोफाईल किंवा एकसारखे आयकॉन वापरत असेल, तर तुम्ही सावध होणं गरजेचं आहे, असं संशोधकांनी सांगितलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या