मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मायक्रोमॅक्सचा स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार! कमी किंमतीत खास फीचर्ससह जबरदस्त फोन

मायक्रोमॅक्सचा स्वस्त स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार! कमी किंमतीत खास फीचर्ससह जबरदस्त फोन

 ‘मायक्रोमॅक्स इन 2C’चं डिझाईन हे बऱ्यापैकी ‘2b’ प्रमाणेच आहे. हा फोन ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन/मरून या शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो.

‘मायक्रोमॅक्स इन 2C’चं डिझाईन हे बऱ्यापैकी ‘2b’ प्रमाणेच आहे. हा फोन ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन/मरून या शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो.

‘मायक्रोमॅक्स इन 2C’चं डिझाईन हे बऱ्यापैकी ‘2b’ प्रमाणेच आहे. हा फोन ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन/मरून या शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो.

  मुंबई, 20 एप्रिल : 2022 साल सुरू झाल्यापासून ओप्पो, व्हिवो, रेडमी, सॅमसंग अशा परदेशी कंपन्या धडाधड नवनवीन मोबाईल लाँच करत आहेत. यामध्ये मग बजेट स्मार्टफोनपासून फ्लॅगशिप स्मार्टफोन पर्यंत सर्व श्रेणींतील मोबाईल्सचा समावेश आहे. कमीतकमी किंमतीत जास्तीत जास्त फीचर्स देण्याच्या या शर्यतीत आता भारतीय मोबाईल कंपनी मायक्रोमॅक्सही (Micromax new smartphone) उतरली आहे. लवकरच भारतात मायक्रोमॅक्सचा स्वस्त आणि मस्त असा नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. काय असतील याचे फीचर्स, आणि किती असेल किंमत? जाणून घेऊया.

  मायक्रोमॅक्सचा हा नवा स्मार्टफोन ‘मायक्रोमॅक्स इन 2C’ या (Micromax in 2c) नावाने लाँच होणार आहे. यापूर्वीच्या मायक्रोमॅक्स इन 2Bचं हे पुढचं व्हर्जन मानलं जात आहे. टिपस्टर सुधांशू अंभोरेने केलेल्या ट्वीटमधील फोटोत या फोनचं डिझाईन आणि कलर व्हेरियंट (Micromax in 2c design) दिसून येत आहेत. ‘मायक्रोमॅक्स इन 2C’चं डिझाईन हे बऱ्यापैकी ‘2b’ प्रमाणेच आहे. हा फोन ब्लॅक, ग्रे आणि ब्राऊन/मरून या शेड्समध्ये उपलब्ध होऊ शकतो. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

  काय आहेत इतर फीचर्स?

  या फोनमध्ये बॅक कॅमेरा सेन्सरच्या खाली एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. तसंच, स्क्रीनवर वॉटर ड्रॉप नॉच पॅनल देण्यात आलं आहे. अर्थात, त्यामुळे स्क्रीन-टू-बॉडी रेशो केवळ 89 टक्के आहे. या स्मार्टफोनला 6.52 इंच एचडी+ डिस्प्ले (Micromax in 2c display features) देण्यात आला आहे, ज्याचं रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले 400 निट्स पर्यंत ब्राईटनेस देतो.

  कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, फोनच्या पाठीमागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यामधील प्रायमरी लेन्स 8 मेगापिक्सलची आहे. सोबतच बॅक कॅमेऱ्याला VGA सेन्सरही देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी पुढच्या बाजूला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा (Micromax in 2c camera) देण्यात आला आहे. या फोनमध्ये UNISOC T610 चिपसेट (Micromax in 2c features) देण्यात आला आहे. ही चिपसेट 4GB आणि 6GB LPDDR4x रॅम आणि 64GB eMMC 5.1 इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करतो. इंटर्नल स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवताही येते.

  या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची तगडी बॅटरी (Micromax in 2c battery) देण्यात आली आहे. सोबतच 10W क्षमतेचा चार्जिंग सपोर्ट या फोनला आहे. म्हणजेच, चार्जिंगचा स्पीड जरी कमी असला, तरी बॅटरी मोठी असल्यामुळे वारंवार फोन चार्ज करण्याची गरज भासणार नाही.

  किती असणार किंमत

  प्राईजबाबाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मायक्रोमॅक्स इन 2C’च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,499 रुपये (Micromax in 2c price) असेल. या फोनचे इतर कॉन्फिगरेशन असलेले व्हेरियंट देखील लाँचिंगच्या वेळी समोर आणले जाण्याची शक्यता आहे.

  एकूणच, या स्मार्टफोनचे जर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजचे व्हेरियंट आणले, तर दहा हजारांच्या रेंजमधील इतर स्मार्टफोन्सना हा भारतीय स्मार्टफोन तगडी फाईट देऊ शकेल.

  First published:

  Tags: Mobile Phone, Smartphone, Tech news