नवी दिल्ली, 28 जून: स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा (Xiaomi) नवा स्मार्टफोन Mi 11 Lite आज पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध केला जात आहे. या सेलची सुरुवात 28 जूनपासून दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, Mi.com, Mi होम स्टोर आणि इतर रिटेल चॅनेलवर सुरू झाली आहे. हा सर्वात पातळ आणि हलका फोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या फोनचं वजन 157 ग्रॅम आहे. Mi 11 Lite 6 GB RAM आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 8 GB RAM वेरिएंटची किंमत 23,999 रुपये इतकी आहे.
HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास, फोनवर 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
Mi 11 Lite फीचर्स -
- 6.55 इंची full HD+ (1,080x2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले
- 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो
- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शन
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732जी प्रोसेसर
- Adreno 618 जीपीयू
- 4,250 mAh बॅटरी
- 33 W फास्ट चार्जिंग सपोर्ट
- USB Type-C पोर्ट
What a beauty😍
Experience #Mi11Lite in 3 delightful colors 🌸 Tuscany Coral 🔵 Jazz Blue ◼️ Vinyl Black Comment your favorite color by using #Mi11Lite #LiteAndLoaded. Starting at 19,499 (incl. offers) Buy Now at https://t.co/D3b3QtmvaT, Mi Home @Flipkart & Retail stores pic.twitter.com/IOfnD8umv1 — Mi India (@XiaomiIndia) June 28, 2021
कॅमेरा -
या फोनला ट्रिपल लेन्स कॅमेरा देण्यात आला आहे. यात एक 64 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सल देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा 30fps फ्रेम रेटवर 4K वीडियो रिकॉर्डिंग करतो. यात लो-लाईट शूटसाठी LED फ्लॅशही देण्यात आला आहे. फोनची जाडी केवळ 6.8 mm आणि वजन 157 ग्रॅम आहे. फोनचं वजन कमी करण्यासाठी मॅग्नेशियम अलॉयचा वापर करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news, Xiaomi