Home /News /technology /

Instagram इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सना झटका! रील्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईत कपात

Instagram इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सना झटका! रील्सच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईत कपात

मेटानं बुधवारी उशीरा दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रील्स बोनसची (Reels Bonus) चाचणी घेत आहे. प्रायजिंग मॉडेल्स निश्चित झाल्यामुळे रील्सच्या पेआउटमध्ये (Payout) चढ-उतार होऊ शकतात.

    मुंबई, 8 एप्रिल : फोटो शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या 'इन्स्टाग्राम'ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. मेटाच्या (Meta) मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सना (Users) सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. नवनवीन फीचर्स (Features) देऊन युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देण्यास सतत प्रयत्नशील असणाऱ्या इन्स्टाग्रामनं आता मात्र, एक पाऊल मागे घेतलं आहे. इन्स्टाग्रामनं आपल्या क्रिएटर्सच्या (Creators) पेमेंटमध्ये 70 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात निर्णय घेतला आहे. याशिवाय मॉनिटायझेशनसाठी (Monetization) आवश्यक असलेलं टारगेटदेखील वाढवण्यात आलं आहे. द फायनॅन्शियल टाइम्सच्या वृत्तानुसार क्रिएटर्सना कंपनीकडून प्रत्येक व्ह्यूसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत 70 टक्क्यांची कपात करण्यात आली असून, आता क्रिएटर्सना व्हिडीओतून पैसे कमवण्यासाठी लाखो व्ह्युज मिळवणं गरजेचं झालं आहे. तेवढे व्ह्यु त्यांच्या व्हिडीओंना मिळाले तरच कंपनीकडून त्यांना पैसे मिळू शकतील. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मेटानं बुधवारी उशीरा दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रील्स बोनसची (Reels Bonus) चाचणी घेत आहे. प्रायजिंग मॉडेल्स निश्चित झाल्यामुळे रील्सच्या पेआउटमध्ये (Payout) चढ-उतार होऊ शकतात. गेल्या वर्षी जुलैमध्ये, इन्स्टाग्रामनं 'Reels Play Bonus Program' ची घोषणा केली होती. या प्रोग्रामअंतर्गत रील्स पोस्ट करणाऱ्या क्रिएटर्सना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एका क्रिएटरनं दिलेल्या माहितीनुसार, सोशल नेटवर्कनं इन्स्टाग्राम पेआउट सिस्टममधील बदलाबद्दल कल्पना दिलेली नाही. तर, आणखी एका व्हिडिओ क्रिएटरनं फायनॅन्शिअल टाईम्सला सांगितलं की, '35 हजार डॉलर्सपर्यंत मोबदला मिळण्यासाठीची पर्सनल व्ह्यु लिमिट 58 मिलियनवरून 359 मिलियनपर्यंत वाढवण्यात आले आहेत.' Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा कंटेंट क्रिएटर्सना आकर्षित करण्यासाठी, फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामनं रीलवर व्हिडीओ (Video) पोस्ट करणार्‍यांना 10 हजार डॉलर्सपर्यंतचे बोनस ऑफर करणं सुरू केलं आहे. कंपनीनं दावा केला आहे की, हा बोनस भविष्यात अधिक पर्सनलाइज्ड होईल. इन्स्टाग्रामप्रमाणे, टिकटॉक (TikTok) आणि स्नॅपचॅट (Snapchat) या सोशल नेटवर्क्सनेही क्रिएटर्सना आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी असाच बोनस प्रोग्राम देऊ केला आहे. तुम्ही वापरत असलले PAN Card बनावट तर नाही ना? तुमच्या मोबाईलद्वारे चेक करा, वाचा प्रोसेस इन्स्टाग्रामनं शॉर्ट व्हिडिओज् आणि रील्सवर आपलं जास्तीतजास्त लक्ष केंद्रित केलं आहे. अॅपवरील एंगेजमेंट ग्रोथसाठी (Engagement Growth), रील्स सर्वांत जास्त योगदान (Largest Contributor) देणारा घटक ठरेल. त्यामुळे कंपनीने रील्समध्ये जास्त गुंतवणूक सुरू ठेवण्याचा विचार केला आहे. 'रील्स (Instagram Reels) हा इन्स्टाग्रामचा वापर वाढवणारा (Growing) आणि महत्त्वाचा (Important) भाग आहे आणि आम्ही या फॉरमॅटमध्ये आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत, असं इन्स्टाग्रामनं काही दिवसांपूर्वी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलं होतं.
    First published:

    Tags: Instagram, Social media

    पुढील बातम्या