Home /News /technology /

Maruti Suzuki च्या स्वस्त कार लवकरच, 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

Maruti Suzuki च्या स्वस्त कार लवकरच, 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल किंमत

मारुती सुझुकी कंपनी लवकरच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या दोन कार बाजारात उपलब्ध करून देणार आहे.

    मुंबई, 03 मार्च : मारुती सुझुकी कंपनी लवकरच पाच लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या दोन कार बाजारात उपलब्ध करून देणार आहे. यामुळे मारुती एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये जोरदार टक्कर देणार आहे. नव्या नियमांनुसार सध्या लहान कारच्या निर्मितींचे प्रमाण कमी होत आहे. कंपनी 800सीसीची एक नवी कार तयार करत आहे. यासोबत 1 लीटर इंजिनची दूसरी एक कारही डेव्हलप केली जात आहे. सध्या भारतात मारुतीची  800 सीसी ची अल्टो आणि 1 लीटर इंजिनची सेलेरिओ ही कार विकली जाते. नवीन तयार होत असलेल्या कारपैकी एक कार 2020 च्या अखेरीस बाजारात उपलब्ध होऊ शकते. 1 लीटर इंजिनची आणि YNC कोड नेम असलेली कॉम्पॅक्ट कार सेलेरिओऐवजी बाजारात उतरू शकते. सध्या सेलेरिओ 1 आणि 1.2 लीटर इंजिनसह उपलब्ध आहे. नव्या 800 सीसी कारचा कोड Y0M असा आहे. पुढच्या वर्षी फेस्टिव्हल सिझनपर्यंत ही कार लाँच केली जाईल. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर केनची आयुकावा यांनी म्हटलं की,'कंपनी 800 सीसी कारसह अनेक मॉडेलवर काम करत आहे.' लहान कार तयार करण्यात सर्वात मोठं आव्हान असतं ते खर्च कमी करणं. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन यामध्ये करावं लागतं. या नियमांमुळे एन्ट्री लेव्हलच्या कारसाठीचा खर्च 10 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती आयुकावा यांनी दिली. हे वाचा : हेल्मेट घालाल तरच सुरू होणार बाईक, पेट्रोलचीही गरज पडणार नाही सध्या ऑटोमोबाइल क्षेत्राची उलाढाल मंदावली आहे. एन्ट्री लेव्हल कार लहान शहरं आणि गावांमध्ये खरेदी केल्या जातात. त्यामुळे 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील कारचे उत्पादन पुढच्या दोन तीन वर्षात 50 लाख युनिटपर्यंत होईल. यात नव्या कारचा समावेश असेल अशी माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे. हे वाचा : Honda City लव्हर्सना लवकरच मिळणार सरप्राइज, मार्चमध्ये लॉंच होणार ‘या’ कार हे वाचा : Hyundai, TaTa, Honda सह या कंपन्यांची बंपर ऑफर, 5 लाख रुपयांचा डिस्काउंट!
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या