मुंबई, 01 ऑगस्ट : प्रवासात ऐनवेळी गाडी बंद पडली की ती दुरुस्त करण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागता. काही ठिकाणी दुरुस्तीसाठी जवळपास काहीच नसतं तेव्हा अडचण निर्माण होते. आता मारुती सुझुकीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवी सेवा सुरू केली आहे. कंपनीने 'service on wheels' नावानं ही सर्विस देण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने सुरु केलेल्या या सर्व्हिसमुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून त्यांचं काम सोपं होणार आहे. एका स्मार्ट वर्कशॉप प्रमाणे ही सर्विस असून ग्राहकांना त्यांची गाडी जिथं असेल तिथं कार दुरुस्त करून मिळणार आहे.
सर्व्हिस ऑन व्हिल्समध्येमारुती सुझुकीच्या प्रवासी वाहनाची सर्व्हिस, दुरुस्ती करण्यासाठी सर्व मॉडर्न टूल्स आहेत. ही सेवा सुरु केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व्हिस ऑन व्हील्स सुरु झाल्यानं आम्ही आनंदी आहे. ग्राहकांसाठी ही एक युनिक सर्विस आहे. एका चारचाकी गाडीत तयार करण्यात आलेलं वर्कशॉप ग्राहकांना आवश्यक त्या सेवा पुरवू शकेल.
मारुती सुझुकीच्या या सर्व्हिसमध्ये पेड आणि फ्री सर्व्हिस देण्यात येणार आहे. यामध्ये रिपेअरींग, इन्स्पेक्शन, ऑइल चेंजिंग, फिल्टर क्लीनिंगसारख्या सेवा मिळतील. ही सेवा मारुती सुझुकीच्या डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी गाड्यांसाठी उपलब्ध आहे.
'अमित शहांच्या उपस्थितीत 2 आमदार आणि एक खासदार भाजपमध्ये करणार प्रवेश'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा