Auto Expo 2020: बहुप्रतीक्षित Vitara Brezza चा फर्स्ट लुक, पाहा आकर्षक SUV कारचा VIDEO

Auto Expo 2020: बहुप्रतीक्षित Vitara Brezza चा फर्स्ट लुक, पाहा आकर्षक SUV कारचा VIDEO

Auto Expo 2020च्या दुसऱ्या दिवशी मारूती सुझुकीने आपली (Maruti Suzuki) बहुप्रतीक्षित Vitara Brezza Facelift समोर आणली आहे. नव्या विटारा ब्रेजा (Vitara Brezza Facelift) आणखी आकर्षक बनवण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : ‘ऑटो एक्सपो 2020’ची (Auto Expo 2020) नोएडामध्ये दिमाखात सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशीही शानदार कारचं लाँचिंग करण्यात आलं. Auto Expo 2020च्या दुसऱ्या दिवशी मारूती सुझुकीने आपली (Maruti Suzuki) बहुप्रतीक्षित Vitara Brezza Facelift समोर आणली आहे.

Vitara Brezza Facelift मध्ये इंजिनमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. आता पर्यंत डिझेलमध्ये येणारी ब्रेझा (Brezza) आता पेट्रोलमध्येही उपलब्ध होणार आहे. Maruti Suzuki Brezzaच्या पेट्रोल इंजिन SUVची बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षा होती. ती अखेर संपुष्टात आली आहे. या SUV मध्ये स्मार्ट हायब्रिड टॅक्नॉलोजीसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचाही पर्याय देण्यात आला आहे.  मायलेजबद्दल सांगायचं झालं तर, मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत 17.03 किमी/प्रति लीटर तर, स्मार्ट हायब्रिडसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये या इंजिनचं मायलेज 18.76 किमी/प्रति लीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने Vitara Brezza Facelift मॉडेलमध्ये आणखीही बदल केले आहेत. ज्यामुळे गाडीला फ्रेश लुक मिळत आहे. फ्रंट ग्रिल लुकमध्ये बदल करण्यात आले आहेत. आणि खाली प्रोजेक्टेड व्हाईट एलईडी लाईट्स देण्यात आल्या आहेत. याआधीच्या मॉडेलच्या तुलनेत नव्या Vitara Brezza Faceliftचा फ्रंट लुक फ्रेश, अधिक बोल्ड आणि जास्त स्पोर्टी दिसत आहे. मागच्या बाजूस एलईडी टेललॅम्प देण्यात आलं असलं तरी डिझाईनमध्ये जास्त बदल करण्यात आलेला नाही. तसेच, बंपर, फॉग लॅम्प हाऊसिंग आणि बुल-बार स्किड प्लेट देण्यात आलं आहे.

Vitara Brezza Faceliftच्या कॅबिनमध्ये 7 इंच इतकी स्मार्टप्ले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाईन कॉन्टेट पाहता येणार आहे. Android आणि Apple CarPlay सपोर्ट करणार हे सिस्टम आहे.

Maruti Suzukiने Auto Expo 2020मध्ये Vitara Brezza Facelift फक्त समोर आणली आहे. या कारचं अधिकृत लाँचिंग या महिन्याच्या अखेरीस होईल, असा अंदाज आहे. आणि त्याच वेळी कंपनीकडून या कारची किमत सांगितली जाणार आहे.

अन्य बातम्या

छोटीशी दमदार इलेक्ट्रिक कार, मिस्टर बीनच्या कारची येईल आठवण, पाहा हा हे PHOTOS

First published: February 6, 2020, 6:46 PM IST
Tags: carnew car

ताज्या बातम्या