मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Maruti Suzuki 7 सीटर Ertiga कारला मोठी पसंती, लाखो गाड्यांच्या विक्रीची नोंद

Maruti Suzuki 7 सीटर Ertiga कारला मोठी पसंती, लाखो गाड्यांच्या विक्रीची नोंद

भारतामध्ये मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये प्रथमच एर्टिगा मॉडेल आणलं आणि पुन्हा खरेदी करणाऱ्या 20 टक्के ग्राहकांमूळे एर्टीगा ही सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही-मल्टी पर्पस व्हीकल कार बनली आहे.

भारतामध्ये मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये प्रथमच एर्टिगा मॉडेल आणलं आणि पुन्हा खरेदी करणाऱ्या 20 टक्के ग्राहकांमूळे एर्टीगा ही सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही-मल्टी पर्पस व्हीकल कार बनली आहे.

भारतामध्ये मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये प्रथमच एर्टिगा मॉडेल आणलं आणि पुन्हा खरेदी करणाऱ्या 20 टक्के ग्राहकांमूळे एर्टीगा ही सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही-मल्टी पर्पस व्हीकल कार बनली आहे.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) Ertiga (Maruti Ertiga) कार नोव्हेंबर 2018 मध्ये लाँच केली होती. लाँच झाल्यापासून कारच्या विक्रीने 5.5 लाख गाड्यांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीची ही कार आता भारतातील सर्वाधिक विक्री होणारं बहुउद्देशीय वाहन (मल्टी पर्पस व्हीकल - एमपीव्ही) बनलं आहे. K-Series पेट्रोल इंजिनसह 1.5 L आणि स्वयंचलित ट्रांसमिशन तंत्रज्ञानाने सज्ज अशी सुसज्ज एर्टिगा स्मार्ट हायब्रिड कार ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये फॅक्टरी फिटेड S-CNG पर्यायही उपलब्ध आहे. भारतात एप्रिल 2012 मध्ये लाँच झाली पहिली Ertiga - मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी, 5.5 लाख कारची विक्री होणं हे त्याच्या यशाचे गमक असल्याचं सांगितलं. भारतामध्ये मारुती सुझुकीने एप्रिल 2012 मध्ये प्रथमच एर्टिगा मॉडेल आणलं आणि पुन्हा खरेदी करणाऱ्या 20 टक्के ग्राहकांमूळे एर्टीगा ही सर्वाधिक विक्री होणारी एमपीव्ही-मल्टी पर्पस व्हीकल कार बनली आहे. श्रीवास्तव पुढे म्हणाले, ग्राहक MPV खरेदी करताना UV शी तुलना करून निर्णय घेतात. पण जरी असं असलं तरी, सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये एर्टिगाने बाजी मारली आहे. बाजारात एर्टिगाचा मार्केट शेअर सर्वात जास्त आहे.

(वाचा - वीजेच्या खांबाला बांधून पत्रकाराला मारहाण;बेकायदेशीर गुन्हे उघड केल्यानंतर हल्ला)

7.59 लाख रुपयांपासून मॉडेलची सुरुवात - Ertiga पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त सीएनजी मॉडेलमध्ये सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे. सीएनजी व्हेरियंटमध्ये येणारी Ertiga एकमेव MPV आहे. एर्टिगा कारची किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरू होते, जिचं टॉप मॉडेल 11.21 लाख रुपयांना उपलब्ध आहे. त्याचबरोबर सीएनजी व्हेरिएंटची किंमत 10.08 लाख रुपये आहे. एर्टिगा भारतीय बाजारमध्ये 1462CC, K15B SMART HYBRID आणि 1498CC, DDis 225 इंजिनसह उपलब्ध आहे. दोन्ही इंजिन 5 मॅन्युअल ट्रांसमिशनसह सुसज्ज आहेत. कारची लांबी 4395 मिमी, रुंदी 1735 मिमी आणि उंची 1690 मिमी आहे.

(वाचा - अक्षय कुमारचा यूट्यूबरवर 500 कोटींच्या मानहानीचा दावा; केले होते गंभीर आरोप)

एर्टिगाच्या बाह्य भागात क्रॅम्ड फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि 3 डी टेल लँप त्याच्या सौंदर्यात भर घालतात. वूड फिनिश आणि क्रोम एक्सेंटसह कारचा डॅशबोर्ड लक्झरी कारचा अनुभव देतो. वाहनातील मोकळी जागा आणि लगेज कंपार्टमेंट विशेषतः ग्राहकांना आकर्षित करतात. सेफ्टीबद्दल बोलायचं तर, ड्युअल एअरबॅग्ज, हिल होल्ड, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम आणि ईबीडीसह (EBD) एबीएस (AB) यासारख्या वैशिष्ट्यांमुळे वाहन सुरक्षित असल्याची जाणीव होते. सुरक्षेच्या दृष्टीने ग्लोबल एनसीएपीने कारला 3 स्टार रेटिंग दिलं आहे.
First published:

पुढील बातम्या