Home /News /technology /

नवी Car खरेदी करायची आहे? या महिन्यात Maruti च्या या Cars वर मिळतेय बंपर सूट

नवी Car खरेदी करायची आहे? या महिन्यात Maruti च्या या Cars वर मिळतेय बंपर सूट

हा महिना मारुति सुझुकी कार घेण्यासाठी सर्वात चांगली वेळ ठरू शकते. जपानी ऑटो निर्माता कंपनी आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे.

  नवी दिल्ली, 18 मे : नवी कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. हा महिना मारुति सुझुकी कार घेण्यासाठी सर्वात चांगली वेळ ठरू शकते. जपानी ऑटो निर्माता कंपनी आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. नेक्सा आणि एरिना अशा दोन्ही डिलरशिपवर हा डिस्काउंट मिळतो आहे. ही ऑफर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट बेनिफिट्स आणि कॅश डिस्काउंट रुपात आहे. एरिना शोरुममधून मारुति कार खरेदी केल्यास या महिन्यात फायदा होऊ शकतो. Swift - मारुति सुझुकी स्विफ्ट एमटी भारतात सर्वाधिक पसंती केली जाणारी हॅचबॅक कार आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास 21000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो. या डिस्काउंटमध्ये 10000 रुपयांची एक्सचेंज ऑफर, 8000 रुपये कॅश डिस्काउंट आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर सामिल आहे. Alto 800 - ऑल्टो 800 चं पेट्रोल आणि स्टँडर्ड वेरिएंट या महिन्यात 21000 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येईल. एरिना शोरुम 8000 रुपये कॅश डिस्काउंट, 3000 रुपये कॉर्पोरेट ऑफर आणि कारसह 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. DZire - मारुति सेडान डिजायर एमटी या महिन्यात23000 रुपयांच्या ऑफरसह खरेदी करता येईल. ग्राहक या डिस्काउंट ऑफरमध्ये 3000 रुपये कॉर्पोरेट सूट, 10000 रुपये रोख सूट आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकतात. मारुति सुझुकी मिनी एसयूव्ही एस-प्रेसो एमटी खरेदी केल्यास 28000 रुपये सेव्ह करता येतील. एरिना शोरुम 15000 रुपये रोख सूट, 3000 रुपये कॉर्पोरेट बोनस आणि 10000 रुपये एक्सचेंज ऑफर देत आहे.

  हे वाचा - FASTag रिचार्ज करताना या चुका करू नका, अकाउंट होऊ शकतं रिकामं

  WagonR - मारुति सुझुकी WagonR सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. WagonR 1.0 लीटर 38000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटमध्ये खरेदी करता येईल. तर कारचं 1.2 लीटर वेरिएंट 18000 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. तसंच सेलेरियो खरेदी केल्यास 33000 रुपयांपर्यंत सेव्ह करू शकता. यात 10000 रुपये एक्सचेंज बोनस, 3000 रुपये कॉर्पोरेट सूट आणि 20000 रुपये रोख सूट ऑफर केली जात आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या