सर्वसामान्यांच्या बजेटमधली Maruti Alto आता CNG व्हेरिएंटमध्ये, जाणून घ्या किंमत

सर्वसामान्यांच्या बजेटमधली Maruti Alto आता CNG व्हेरिएंटमध्ये, जाणून घ्या किंमत

मारुती सुझकीनं Alto BS6 ची S-CNG वेरिएंट लाँच केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी :  सर्वसामान्यांचं कारचं स्वप्न मारूती सुजुकीच्या Altoने पूर्ण केलं. म्हणून ग्राहक नेहमीच Altoला पसंती देत असतात. कंपनीही ग्राहकांसाठी नवनव्या व्हेरिएंटमध्ये कार बाजारपेठेत घेऊन येते. आता मारुती सुझकीनं Alto BS6 ची S-CNG वेरिएंट लाँच केली आहे. LXI आणि LXI (O) मध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांना याचा मायलेजमध्ये फायदा मिळणार आहे.

BS6 इंजिनसोबत येणारी मारूती Alto ही पहिली कार आहे. LXI आणि LXI (O) मध्ये सीएनजी असून यासाठी ग्राहकांना अनुक्रमे 4 लाख 32 हजार आणि 4 लाख 36 हजार (ex-showroom, Delhi) इतकी किंमत मोजावी लागणार आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की, Alto CNG कार 31.59 किलोमीटर/किलोग्रॅम असा मायलेज देईल.

Maruti Alto मध्ये 796 cc इंजिन आहे. CNG मोडमध्ये हे इंजिन 40.36 bhp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करतो. तर, पेट्रोलवर चालताना हे इंजिन 47.33 bhp पॉवर आणि 69 Nm टॉर्क जनरेट करतो.

‘मारुती सुझुकीमध्ये आम्ही नेहमी अशाच उत्पादकांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करतो, जी टेक्निकली अडव्हान्स असतील. आमचे ग्राहक सीएनजी टेक्नोलॉजीचा वापर अधिक करतात, त्यामुळे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळतो’, अशी भावना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.

मारुतीकडून पहिली BS6 कार ही Alto होती. एप्रिल 2019मध्ये ती कार लाँच करण्यात आली होती. कंपनीनं आतापर्यंत BS6 Altoची एक लाखाहून अधिक युनिट विकल्या आहेत. गेल्या एका दशकात मारुती सुजुकीची Alto मॉडेल सर्वाधिक विक्री होणारी मॉडेल आहे. मारुती सुजुकीनं नुकतीच आपली सेडान कार Ciaz पण BS6 मध्ये लाँच केली आहे.

First published: January 30, 2020, 12:03 PM IST
Tags: new car

ताज्या बातम्या