Home /News /technology /

Android Apps क्रॅश होत असल्याची समस्या; गुगलने स्टेटमेंट जारी करत दिली माहिती

Android Apps क्रॅश होत असल्याची समस्या; गुगलने स्टेटमेंट जारी करत दिली माहिती

Android System WebView हे, अ‍ॅप क्रॅश होण्यामागचं एक कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच सिस्टममुळे अँड्रॉईड अ‍ॅप्सवर वेब कन्टेंन्ट पाहता येऊ शकतो. यातच काही समस्या आल्याने, अ‍ॅप्स क्रॅश होत आहेत.

  नवी दिल्ली, 23 मार्च : अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल आणि अ‍ॅप क्रॅश होत असल्याची समस्या येतेय का? अँड्रॉईड अ‍ॅपबाबत अशी समस्या येत असल्यास हे केवळ तुमच्यासोबत होत नाहीये. जगभरातील अनेक युजर्सला ही समस्या येते आहे. गुगल याच्या फिक्सबाबत काम करत आहे. पण हे नेमकं कशामुळे होतंय? Android System WebView हे, अ‍ॅप क्रॅश होण्यामागचं एक कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच सिस्टममुळे अँड्रॉईड अ‍ॅप्सवर वेब कन्टेंन्ट पाहता येऊ शकतो. यातच काही समस्या आल्याने, अ‍ॅप्स क्रॅश होत आहेत. गुगलने याबाबत एक स्टेटमेंटही जारी केलं आहे. या स्टेटमेंटमध्ये कंपनीने सांगितलं की, काही युजर्ससाठी अ‍ॅप क्रॅश होत आहेत आणि हे WebView मुळे होत आहे. कंपनी ही समस्या सोडवण्यावर काम करत असल्याचं गुगलने सांगितलं आहे.

  (वाचा - जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक)

  सोशल मीडियावर अँड्रॉईड युजर्स सतत या समस्येबाबत रिपोर्ट करत आहेत. सॅमसंग सपोर्टच्या ट्विटर हँडलवरही अ‍ॅप क्रॅशबाबत ट्विट करण्यात आलं आहे. सॅमसंगने अ‍ॅप क्रॅश समस्या सोडवण्यासाठी एक पर्यायही सांगितला आहे.

  (वाचा - हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय)

  सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या सोडवण्यासाठी सर्वात आधी सेटिंग्जमध्ये जावं लागेल. त्यानंतर अ‍ॅप्समध्ये तीन डॉट्स आयकॉनवर टॅप करावं लागेल. येथे Show System Apps मध्ये जाऊन Android System WebView सर्च करावं लागेल. हे सर्च करुन Uninstall Updates वर क्लिक करावं लागेल.

  (वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

  काही युजर्सनी या स्टेप्स फॉलो केल्यानंतर ही समस्या ठिक झाल्याचं म्हटलं आहे. तर काही युजर्सला अद्यापही अ‍ॅप क्रॅश होत असल्याची समस्या आहे. गुगल लवकरचं याबाबत अपडेट जारी करणार असून, त्यानंतर ही समस्या ठिक होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Android, Google, Tech news

  पुढील बातम्या