नवी दिल्ली, 16 जून : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्विटरवर (Twitter) त्यांचे जवळपास 80 हजार फॉलोवर्स केवळ 36 तासांत कमी झाल्याचा दावा केला आहे. 2018 मध्ये बिग बी, अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे फॉलोवर्स अचानक कमी झाल्याचं म्हटलं होतं. ही सेलिब्रिटींची गोष्ट झाली, परंतु तुम्हालाही वाटतंय तुमचेही ट्विटर अकाउंटचे फॉलोवर्स अशाप्रकारे कमी झाले आहेत, तर यामागे एक कारण आहे. यामागचं कारण स्वत: ट्विटरनेच सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्सनी त्यांचे फॉलोवर्स अचानक कमी होत असल्याची तक्रार केली.
स्पॅम प्रोफाईल -
अचानक फॉलोवर्स कमी होण्यामागे ट्विटरने स्पॅम प्रोफाईल हटवणं हे कारण सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये ट्विटरने सांगितलं, की कंपनी अकाउंट्सला पासवर्ड किंवा फोन नंबरने वेरिफाय करण्यासाठी सांगते. स्पॅम रोखण्यासाठी आणि सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे असं केलं जातं. याचा अर्थ असा, की ट्विटर अशा खात्यांची तपासणी करतं, जे एकतर ऑफलाईन प्रोजेक्ट करतात किंवा तात्पुरते ईमेल आयडीसह तयार केलेली ट्रोल अकाउंट्स म्हणून कार्य करतात.
Twitter via SMS service -
गेल्या वर्षी ट्विटरने बहुतेक देशांमध्ये एसएमएस सेवेद्वारे ट्विटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान ही सेवा हटवल्यामुळे काही युजर्सला आपल्या फॉलोवर्समध्ये कमी आल्याचं पाहायला मिळालं.
अशी निष्क्रिय अकाउंट्स काढून टाकल्यास वापरकर्त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर अधिक सक्रिय आणि प्रामाणिक फॉलोवर्स राहतील, असं कंपनीने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Twitter, Twitter account