मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं अन्न खरंच घातक असतं का? काय आहे सत्य?

मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं अन्न खरंच घातक असतं का? काय आहे सत्य?

मायक्रोवेव्हच्या रेडिएशन्स हानिकारक असतात. त्या वाईट यापासून त्यामुळे कॅन्सर होतो इथपर्यंत अनेक गोष्टी आपण मायक्रोवेव्हबद्दल ऐकतो... यातलं खरं किती आणि खोटं किती?

  • Share this:

मुंबई, 4 ऑगस्ट : मायक्रोवेव्हविषयी अनेकांच्या मनात काही समज-गैरसमज असतात. त्यामध्ये एखादा पदार्थ करायचा म्हणजे आपल्याला अवघड काम वाटतं. त्याबाबत एका प्रकारची भीती असते. मायक्रोवव्हचा अतिवापर हानीकारक आहे किंवा त्यात गरम केलेलं अन्न धोकादायक असतं वगैरे अनेक गोष्टी कानावर येत असतात. त्यामुळे मायक्रोवेव्हच्या वापराबद्दल अनेक शंका मनात असतात. अनेकांच्या घरी फक्त राहिलेलं अन्न गरम करण्याइतकाच 30 सेकंदांसाठी त्याचा वापर केला जातो. खरं तर मायक्रोवेव्हबद्दल अनेक गैरसमज आहेत. मायक्रोवेव्हपासून धोका असल्याचं कुठल्याही वैज्ञानिकाने किंवा तज्ज्ञाने सिद्ध केलेलं नाही. ते फक्त समज आहेत.

(वाचाः हा AC कपड्यांसोबत घाला आणि राहा गारेगार, स्मार्टफोनपेक्षा आहे छोटा)

उलट पदार्थ कमी तेलात न जळता, करपता व लगेच तयार होतो म्हणून मायक्रोवेव्हला पसंती द्यावी, असं आहारतज्ज्ञ सुचवतात. याविषयी अनेकांना कमी माहिती असते आणि त्त्यामुळे गैरसमज वाढतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकीच्या समजांविषयी काही खरं-खोटं ज्ञान देणार आहोत.

खाण्याची पौष्टीकता होते कमी?

अनेकांचा असा भ्रम असतो की, मायक्रोवेवमध्ये अन्न शिजवलं तर त्याचे पौष्टिक घटक कमी होतात. खरं तर पदार्थ कोणत्याही पद्धतीने शिजवताना त्यामध्ये थोडे रासायनिक बदल होतात. भाज्या शिजवतानाही त्यातील काही आवश्यक घटक हे कमी होतात. उलट मायक्रोवेव्हमध्ये खाणं तयार करण्यासाठी कमी पाण्याची आवश्कता असते. त्यामुळे त्या पदार्थाचे घटक टिकण्याची शक्यता मायक्रोवेवमध्ये अधिक असते. तुम्ही निश्चिंतपणे मायक्रोवेव्हचा वापर अन्न शिजवण्यासाठी करू शकता. फक्त खाणं गरम न करता त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ शिजवायचा प्रयत्न करा. मात्र कोणत्याही तंत्रज्ञानाचा किंवा उपकरणाचा अतिवापर हा आरोग्यासाठी चांगला नसतो. गरज असेल तरच ओव्हनचा वापर करा आणि रोजच्या जेवणासाठी वापर शक्यतो टाळा. त्यातील लहरी अन्नावर परिणाम करू शकतात.

मायक्रोवेव्हबद्दल काही फॅक्ट्स

मायक्रोवेव्ह ही एक प्रकारची इलेक्ट्रॉनिक एनर्जी आहे.

मायक्रोवेव्हमध्ये इन्फ्रारेड  रेडिएशन व मायक्रोवेव्ह याप्रकारची एनर्जी असते.

मायक्रोवेव्हमध्ये धातूची भांडी वापरायची नसतात. कारण मेटल अॅंटेना सारखं काम करते.

लहरी खेचताना ते उलट परावर्तित होऊन स्पार्क होऊ शकतात. ओव्हनकरिता वेगळ्या प्रकारची भांडी येतात त्याचा वापर करावा.

(वाचाः मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी?)

त्यामध्ये उष्णता लवकर पोहचून खाणं व्यवस्थित शिजतं. ही भांडी पातळ असतात. त्यामुळे लगेच गरम होतात. त्यांना हाताळताना हातमोज्यांचा वापर नक्की करा. अनेकांना असाही गैरसमज आहे की, ओव्हन वापरल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते. मात्र हा समज चुकीचा आहे. मायक्रोवेव्हमध्ये इन्फ्रारेड  रेडिएशन असतात  ज्याने अन्न गरम होतं किंवा शिजतं

आला रे आला..गुजराती 'सिंबा' आला, खऱ्या पोलिसाचा VIDEO तुफान व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 08:52 AM IST

ताज्या बातम्या