नवी दिल्ली, 25 जुलै: सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियाचा वापर करतात. पण सोशल मीडियावर अकाउंट (Social Media Account) ओपन करण्यासाठी काही नियम आणि अटी आहे. यात वयाचीही मर्यादा देण्यात आली आहे. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) यासारख्या सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यासाठी कमीत-कमी 13 वर्ष वय असणं गरजेचं आहे. परंतु NCPCR च्या नव्या अभ्यासानुसार, 10 वर्ष वयोगटातील तब्बल 37.8 टक्के मुलं फेसबुकवर सक्रीय असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 10 वर्षीय 24.3 टक्के मुलांचं इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. हे माध्यमांनी ठरवलेल्या नियमांच्या विरोधात आहे.
बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग अर्थात NCPCR कडून इंटरनेट सेवेसह मोबाईल फोन आणि इतर डिव्हाईसचा प्रभाव या विषयावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात 10 वर्ष वयोगटातील अनेक मुलं सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं समोर आलं आहे.
सोशल मीडियावर विविध प्रकारचा कंटेंट असतो. यात मुलांसाठी उपयुक्त नसणारा कंटेंटही मोठ्या प्रमाणात असतो. त्याशिवाय मुलांना सोशल मीडियावर धमकी किंवा चुकीच्या वागणुकीचा सामनाही करावा लागू शकतो. यामुळे मुलांवर गंभीर परिणामही होऊ शकतो. त्यामुळेच या दिशेने सोशल मीडियाबाबतच्या नियमांचं सक्तीने पालन करण आवश्यक आहे.
जगात इतकी लोकसंख्याही नाही, जितक्या वेळा Google चं हे App डाउनलोड करण्यात आलं
NCPCR च्या अभ्यासात एकूण 5811 जणांचा समावेश होता. यात 3491 मुलं, तर 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळा सामिल होत्या. या अभ्यासात सामिल झालेल्या 62.2 टक्के लोकांनी मुलं पालकांच्या मोबाईलद्वारे इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Instagram, School children, Social media, Tech news