घरात साप शिरताच घेतली गुगलची मदत, व्यापाऱ्याला हजारो रुपयांचा गंडा

घरात साप शिरताच घेतली गुगलची मदत, व्यापाऱ्याला हजारो रुपयांचा गंडा

सध्या कोणतीही माहिती हवी असेल तर गुगलवर शोधली जाते. पण यातून फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : स्मार्टफोन, इंटरनेट सहज उपलब्ध झाल्यानंतर त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कोणतीही गोष्ट घ्यायची असली तरी आधी इंटरनेटवर सर्च केलं जातं. त्याबद्दल माहिती ऑनलाइन माहिती घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या माहितीवर विश्वास ठेवणं महागात पडू शकतं. गुगलवरून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवणं एका व्यापाऱ्याला महागात पडलं आहे. भोईवाडा इथल्या एका व्यापाऱ्याने घरात साप आल्यानंतर थेट गुगलची मदत घेतली. त्याने गुगलवर सर्पमित्राचा नंबर शोधला. त्यानंतर त्या सर्पमित्राने व्यापाऱ्याची 36 हजारांची फसवणूक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डोंगरी इथं राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचे परळ भोईवाढा इथं कापड दुकान आहे. दुकानात गेल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांना घरात साप असल्याचा फोन आला. तेव्हा त्यांनी सर्पमित्राला बोलावण्यासाठी थेट गुगलची मदत घेतली. त्यांनी गुगलवर सर्पमित्राचा नंबर शोधला.

गुगलवर त्यांना हेल्पलाइन क्रमांक मिळाल्यावर त्यांनी एक कॉल केला. तेव्हा संबंधित व्यक्तीने मी तुमचा नंबर माझ्या मित्राला देतो. तो तुम्हाला कॉल करेल असं सांगितलं. तो कॉल बंद केल्यानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या एका नंबरवरून त्यांना कॉल आला.

व्यापाऱ्याला दुसऱ्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मी अॅनिमल हॉस्पिटल केअर सेंटर परेलमधून बोलत आहे असं सांगण्यात आलं. तुम्हाला एक लिंक पाठवतो त्यावर दहा रुपये पाठवा. हॉस्पिटलची प्रोसेस असल्याचं त्यांना समोरील व्यक्तीने सांगितलं. कॉल ठेवल्यानंतर त्यांनी आलेल्या लिंकवर क्लिक केलं आणि डिटेल्स भरून ऑनलाइन पेमेंट केलं. त्यानंतर पुढच्या काही मिनिटात त्यांच्या खात्यातून 6 हजार, 29 हजार 999 आणि 700 रुपये काढण्यात आले.

वाच : मोबाइल गरम होत असेल तर काळजी घ्या, होऊ शकतो स्फोट

घरात आलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी मदत घ्यायला गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर खाते ब्लॉक केलं आणि पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कॉल लागला नाही. अखेर व्यापाऱ्याने या फसवणुकीची तक्रा भोईवाडा पोलिस ठाण्यात केली असून अधिक तपास सुरू आहे. तसेच गुगलवर मिळणारी प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

इंटरनेट नसेल तेव्हाही वापरा YouTube, Gmail आणि Google Map

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 11:45 AM IST

ताज्या बातम्या