मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तरुणाने फक्त 35 हजार रुपयांना ऑर्डर केला iPhone 13; दोन दिवसांनी बसला धक्का, नेमकं काय घडलं?

तरुणाने फक्त 35 हजार रुपयांना ऑर्डर केला iPhone 13; दोन दिवसांनी बसला धक्का, नेमकं काय घडलं?

iphone 13

iphone 13

सध्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर सेल सुरू आहेत. सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे लोक मोठ्या त्यांना हव्या त्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : सध्या ऑनलाइन शॉपिंग अॅप्सवर सेल सुरू आहेत. सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यामुळे लोक मोठ्या त्यांना हव्या त्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही Big Billion Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काउंट दिलं जात आहे. सर्वांत महागडे स्मार्टफोन्स iPhones वरदेखील ग्राहकांना डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे आयफोनचे चाहते फोन ऑर्डर करत आहेत.

फ्लिपकार्टच्या सेलमधून एका व्यक्तीने 70 हजार रुपये किमतीचा iPhone 13 फक्त 35 हजार रुपयांना ऑर्डर केला. ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरीची उत्साहाने वाटत पाहत असलेल्या व्यक्तीला दोन दिवसांनी धक्का बसला. तर, झालं असं, की फ्लिपकार्ट iPhone 13 वर एक्सचेंज ऑफर देत आहे. प्रणित नावाच्या व्यक्तीने ऑफरचा फायदा घेत 35 हजार रुपयांना आयफोन 13 खरेदी केला. मात्र दोन दिवसांनी ही ऑर्डर रद्द झाली. हे पाहून प्रणित प्रचंड चिडला आणि त्याने ट्विटरवर फ्लिपकार्टला टॅग करून आपला राग व्यक्त केला. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.

हेही वाचा - Vodafone-Idea ग्राहकांची चिंता वाढली, पैसे न भरल्यास नोव्हेंबरपासून बंद होऊ शकते सेवा

ऑर्डरचा स्क्रीनशॉट टाकत प्रणितने ट्विट केलं. त्याने लिहिलं, 'मी कंझ्युमर कोर्टात माझी तक्रार कशी दाखल करू? कृपया मला मदत करा.' या ट्विटमध्ये त्याने फ्लिपकार्टला टॅग करत #FlipkartBigBillionDays #Flipkart हे हॅशटॅग देखील वापरले होते. प्रणितचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालंय. अनेक युजर्स त्यावर कमेंट करत आहेत. एकाने प्रणितच्या पोस्टवर कमेंट केली की,'खरं तर फ्लिपकार्ट आधी सेल प्राईस 50 हजार सांगतं, नंतर काही वेळाने 50 ते 52 नंतर 54 आणि नंतर 57 सांगतं. म्हणूनच फ्लिपकार्ट हा एक वाईट प्लॅटफॉर्म असल्याचं दिसतंय. पण काय करावं, कारण बहुतेक स्मार्टफोन फक्त तिथेच मिळतात. F म्हणजे फ्लिपकार्ट आणि F म्हणजे फ्रॉड.’

दरम्यान, फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये iPhone 13 च्या किमतीची चांगलीच चर्चा आहे. आयफोनने नवी सीरिज लाँच केल्यानंतर या फोनच्या किमतींत घट केली होती. त्यामुळे हा फोन 50 हजार रुपयांना मिळेल, असं लोकांना वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र अनेकांना त्याहीपेक्षा कमी किमतीत हा फोन मिळाला. पण प्रणितप्रमाणेच काहींच्या ऑर्डरही रद्द झाल्या. सेलरजवळचा स्टॉक संपल्याने ऑर्डर रद्द झाली असेल असं म्हटलं जातंय; पण फ्लिपकार्टने या ट्विटवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरीची वाट बघत असताना ऑर्डर केल्याने अनेक जण नाराज झाले आहेत.

First published:

Tags: Iphone, Mobile, Online shopping, Shopping