• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • सावधान! Vaccine च्या नावाने Malware ची युजर्सच्या बँक आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एन्ट्री, अशी होतेय फसवणूक

सावधान! Vaccine च्या नावाने Malware ची युजर्सच्या बँक आणि कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एन्ट्री, अशी होतेय फसवणूक

भारतीय युजर्सला निशाणा करणाऱ्या SMS चे काही पुरावे मिळाले आहे, जे सर्वात सुरुवातीला वॅक्सिनच्या (Vaccine) नावाने झालेल्या फसवणुकीपैकी एक आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जून: भारतासह जगभरात अनेक लोक कोरोनामुळे चिंतीत असताना हॅकर्स (Hackers) याचाच गैरफायदा घेत आहेत. हॅकर्स SMS किंवा WhatsApp द्वारे युजर्सला मेसेज पाठवून वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत आहेत. एकदा युजरने हॅकरने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजरची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. MaAfee ने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय युजर्सला निशाणा करणाऱ्या SMS चे काही पुरावे मिळाले आहे, जे सर्वात सुरुवातीला वॅक्सिनच्या (Vaccine) नावाने झालेल्या फसवणुकीपैकी एक आहेत. SMS आणि WhatsApp वर मेसेज पाठवून युजर्सला एक वॅक्सिन अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी सांगितलं जातं. एकदा अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर त्यातील मालवेअर (Malware) पुढे SMS किंवा WhatsApp च्या माध्यमातून युजरच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या सर्वांना स्वत:चं मेसेज पाठवतो. SMS हाईड करतो मालवेअर - रिपोर्टनुसार, एकदा हा मालवेअर स्टोर करणारं अ‍ॅप गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून इन्स्टॉल झाल्यानंतर, तो मालवेअर नोटिफिकेशन लिसनर फंक्शनचा उपयोग करुन येणारे SMS हाईड करतो. हॅकर्स जगभरातील शेकडो वित्तीय संस्थांना निशाणा करत बँकिंग ट्रोजनचा वापर करत आहेत.

  (वाचा - Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका)

  कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असताना, दुसरीकडे सायबर क्राईम प्रकरणांतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मोबाईलवर मेसेज, WhatsApp किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या लिंकवर क्लिक न करणाऱ्याचा सल्ला जाणकारांकडून देण्यात येत आहे. अधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाईटवरच योग्य ती माहिती घ्यावी, तसंच कोणत्याही फॉर्वर्ड आलेल्या बक्षिसांच्या लिंकवरही क्लिक करू नये.
  Published by:Karishma
  First published: